अहमदनगर (प्रतिनिधी कृष्णा साठे) – गेल्या आठ दिवसापासून नेवासा फाटा परिसरातील काही भागांमध्ये अनियमित बनलेला वीज पुरवठा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांनी स्वतः दुरुस्त करून सुरळीत केल्याने त्यांचे या परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या आठ दिवसापासून नेवासा फाट्यावरील मोठ्या भागात सुरळीत वीज पुरवठ्यात व्यत्यय येत होता. वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याबरोबरच विजेचा दाब सातत्याने कमी जास्त होण्याचा प्रकार वाढल्याने घरगुती व व्यावसायिक ग्राहक वैतागले होते. संबंधित कर्मचाऱ्यास लोकांनी वारंवार याबाबत सूचित करूनही हा प्रकार थांबन्या ऐवजी वाढतच चालल्याने आणि सणासुदीच्या काळात वेगळेच संकट मानगुटीवर बसण्याची भावना लोकांनी मध्ये निर्माण झाली याबाबत अनेक ग्रामस्थांनी तक्रारी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी फोन द्वारे नेवासा फाट्याचे अधिकारी शेजवळ त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
परंतु शेजवळ यांनी कॉल न घेतल्यामुळे त्यांनी त्यांचे वरिष्ठ असलेले नेवासा विभागाचे उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांच्याशी संपर्क साधला. रात्री आठ वाजता उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांनी या बिघाड झालेल्या परिसरात येऊन ज्या ठिकाणी वीज रोहित्र आहे. त्या ठिकाणी पाहणी करून तसेच ट्रांसफार्मर चेक करून तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याचे विज कर्मच्यार्याना आदेश दिले तसेच तक्रार असणाऱ्या ग्राहकांच्या घरी जाऊन सप्लाय चेक केला.
एक वरिष्ठ अधिकारी आपल्या घरी येऊन रात्रीच्या वेळेस आपली अडचण सोडवतात हे लोकांसाठी एक कुतूहलाचा विषय बनला. यावेळी सर्व लोकांनी एकत्र येऊन कर्तव्यदक्ष नेवासा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शरद शेषराव चेचर यांचा उस्फुर्त सत्कार करून कौतुक केले. यावेळी चेचर यांनी उपस्थित ग्राहकांशी अनेक विषयावर चर्चा केली व ग्राहकांना सुरक्षा विषयी माहिती दिली. यावेळी वीज कर्मचारी उपस्थित होते.







