मुंबई (चित्रपटविभाग उपसंपादक सचिन देसाई) – बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म ४ नोव्हेंबर, १९७० रोजी झाला. बॉलिवूडची एक दमदार अभिनेत्री असलेल्या तब्बूच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सर्वांपासून लपलेल्या नाहीत. तब्बूने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. ती आजदेखील चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. तिने तमिळ, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या दमदार अभिनयासाठी तिला दोनवेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तब्बूने वयाच्या १४ व्या वर्षी ‘हम नौजवान’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. या चित्रपटात तिने देवानंद यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.
तब्बूने अद्याप लग्न केलेलं नाही. असं म्हटलं जातं की, तब्बूचे नाव साउथ स्टार नागार्जुनसोबत जोडलं गेलं होतं. तब्बूने नागार्जुनमुळे लग्न केलं नव्हतं. परंतु, दोघांचं नातं टिकू शकलं नाही. अनेक चित्रपटविषयक मासिकामध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्तानुसार, तब्बू नागार्जुनशी खूप प्रेम करत होती. प्रेमासाठी ती मुंबई सोडून हैदराबादमध्ये सेटल झाली होती. नागार्जुन आणि तब्बूचं नातं १५ वर्षांपर्यंत चाललं. त्यावेळी नागार्जुन विवाहित होता.
तब्बूचं पूर्ण नाव तब्बसुम हाशमी असं आहे. तब्बूचा पहिला तेलुगु चित्रपट ‘कुली नंबर १’ होता. बॉलिवूडमध्ये तब्बूने पहिला साईन केलेला चित्रपट होता-‘प्रेम’. परंतु, बोनी कपूर यांचा हा चित्रपट बनण्यास ८ वर्षे लागली. म्हणून ‘पहला पहला प्यार’ हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला.
बॉलिवूडमध्ये तिने चित्रपट विजयपथ (१९९४) मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटामध्ये तिने दिव्या भारतीच्या निधनानंतर रीकास्ट करण्यात आलं होतं. या पहिल्या चित्रपटामध्ये ती अजय देवगनसोबत झळकली होती. त्यानंतर ती प्रेम, हकीकत आणि हिम्मत यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपट माचिससाठी तिला पहिला नॅशनल ॲवॉर्ड मिळाला. यानंतर तिने साजन चले ससुराल, दर्मया, विरासत, चाची ४३०, हुतुतु, कोहराम, हेरा फेरी, हम साथ साथ हैं, चांदनी बार, द नेमशेक, मकबूल, हैदर, दृश्यम, गोलमाल अगेन, मिसिंग आणि दे दे प्यार दे यासारखे चित्रपट केले.
तसं पाहिलं तर तब्बू आपल्या लग्नाबद्दल कधी कमेंट करत नाही. परंतु, एकदा तिने आपल्या लग्नाबद्दल एक खुलासा केला होता. तिने म्हटलं होतं की, ‘जर माझ्या चुलत भावासोबत मिळून अजयने त्या सर्व मुलांना धडा शिकवला नसता तर कदाचित आज माझा संसार झाला असता. त्या मुलांनी मला प्रपोज केलं होतं.’
तब्बू म्हणाली होती की, ‘अजय देवगन माझ्याबद्दल इतकं प्रोटेक्टिव्ह होता की, मी एखाद्या मुलाशी बोलले तरी त्याला वाटायचं की, तो मला छेडत आहे. तो माझ्या चुलत भावासोबत मिळून माझी हेरगिरी करत होता. दोघे तासनतास माझा पिच्छा करायचे. दोघांनी मिळून ही गोष्ट कधी पुढे जाऊ दिली नाही.’ तब्बू पुढे म्हणाली होती की, लग्न न करण्याच्या निर्णयाने आपण खुश आहोत.







