नागपूर (प्रतिनिधी) – लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तरुणीवर ट्रकच्या केबिनमध्ये अत्याचार केला. ही घटना जरीपटका भागात घडली.
तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोलू सिंग ऊर्फ गुरुप्रीतसिंह गिडल (वय २५, जरीपटका) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित २० वर्षीय तरुणीला गोलूने लग्नाचे आमिष दाखविले. लग्नाबाबत बोलायचे असल्याचे सांगून ऑक्टोबर महिन्यात गोलूने तरुणीला पाटणकर चौकात बोलाविले.
तरुणी तिथे आली. गोलूने बळजबरीने जवळीलच उभ्या ट्रकच्या केबिनमध्ये तरुणीला नेले. अत्याचार करून तिला ठार मारण्याची धमकी दिली. तरुणीने जरीपटका पोलिसांत तक्रार दिली.







