जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्या वतीने भाजपा कार्यालयात रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाने जिल्ह्यात सांस्कृतिक सेल चळवळ रुजावी, वाढावी ह्या उद्देशाने पक्षात आता सांस्कृतिक सेलच्या माध्यमातून नियुक्त्या करण्यात आल्या व सांस्कृतिक सेलच्या उपक्रमात नटराज पूजन करून रंगभूमी दिन साजरा करण्याचा हा भारतीय जनता पार्टी चा पहिलाच कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
ह्या कार्यक्रमात आदरणीय मा. आ. राजुमामा भोळे जळगाव जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. राजेंद्र घुगे स्थायी समिती सभापती, राधेश्याम चौधरी भाजपा महानगर सरचिटणीस, विशाल त्रिपाठी भाजपा महानगर सरचिटणीस, महेश जोशी भाजपा महानगर सरचिटणीस, नितीन भाऊ इंगळे भाजपा महानगर सरचिटणीस. सर्व मान्यवरांच्या हस्ते रंगकर्मींचे सत्कार करण्यात आले. जास्तीत जास्त रंगकर्मी, युवा रंगकर्मींनी आमच्या सांस्कृतिक सेलला जुडावे व ह्या व्यासपीठाचा चित्र, नाट्य व नृत्यासाठी उपयोग करावा असे मनोगत दीपक सूर्यवंशी जळगाव महानगर अध्यक्ष यांनी व्यक्त केले.
राजुमामा भोळे यांनी जळगावातील तमाम रंगकर्मींना आवाहन केले की, आमच्या सेल च्या मार्फत जर काही मदत लागली तर तो निःसंकोच सांगावी आम्ही ती नक्की करू व ह्या आमच्या सांस्कृतिक सेलच्या माध्यमाने अनेक कलाकारांचे प्रश्न आम्ही नक्की सोडवू असे मनोगत व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विशाल जाधव यांनी सांस्कृतिक क्षेत्रातल्या अनेक संध्यांची ओळख करून त्याचा फायदा कसा होईल हे मनोगत व्यक्त केले.
प्रदेश सहसंयोजक गितांजली ठाकरे ताई यांनी महिला कलाकारांच्या अडचणींवर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जळगाव महानगर संयोजक भावेश पाटील तर सहसंयोजक योगेश लांबोळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश भारंबे, अंकुश काकडे, दीपक भुसारी, मयूर भंगाळे शुभम सपकाळे, मोक्षदा लोखंडे, श्रेया जोशी, विपुल टेकावडे यांनी परिश्रम केले







