सरकारी हमीभावासाठी नवापूर तहसील कार्यालयात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे निदर्शने

satyashodak-morcha
संग्रहित छायाचित्र

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – आज (दि. ५) नंदुरबार जिल्हा आदिवासीबहुल असून याठिकाणी कलेक्टर, आमदार-खासदार हे देखील आदिवासी आहेत. परंतु जिल्ह्यातील अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्यांना स्थानिक व्यापाऱ्यांकडून हमीभाव न देता दिवसाढवळ्या लूट केली जात आहे. यावर कोरोनाची भीती दाखवून लुट थांबवायला कोणीही तयार नाही. नवापूर तालुक्यात 100% आदिवासी अल्पभूधारक शेतकरी असून आज अखेर शासकीय धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका धान्याची कमी किमतीने खरेदी करून फसवणूक होत आहे. यासंदर्भात सत्यशोधक शेतकरी संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करून देखील दखल घेतली जात नाही.

 

 

त्यामुळे आज सत्यशोधक शेतकरी संघटनेने नवापूर तहसील कार्यालयावर निदर्शने करत खरेदी केंद्र सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here