शहादा येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी विविध मागण्यांसाठी जनता आक्रोश मोर्चा

akrosh-morcha-shahada

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – आज (दि. ५) नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्यातर्फे विविध मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनता आक्रोश मोर्चा काढण्यात आला.janta-akrosh-morcha

 

 

शहादा येथे विविध मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्यामार्फत जनता आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.सारंखेडा येथील आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कात्रज येथील घटनेचा निषेध करीत मोदी सरकार दलितांवर कशा प्रकारे अन्याय करीत आहेत याबाबत जयदीप कवाडे बोलत होते. मोदी सरकार सबका साथ खुदका विकास या पद्धतीने काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.janta-akrosh-morcha

 

 

मोदी सरकार जनतेची दिशाभूल करत आहे,देशात वीज ,पाणी व रोजगार याबाबतचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर असून त्याकडे केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे, दलित ,आदिवासी ,ओबीसी यांचे प्रलंबित प्रश्न त्यांनी तातडीने मार्गी लावले पाहिजेत ,त्याचप्रमाणे हाथरस येथील दलित तरुणीच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशी दिली पाहिजे असे अनेक मुद्दे यावेळी उपस्थित केले. आदिवासी समाजावर होणारे अन्याय अत्याचार त्वरीत थांबवले पाहिजे. कामगार विरोधी व शेतकरी विरोधी बिल सरकारने त्वरित मागे घ्यावे. अन्यथा पी आर पी आदिवासींच्या न्यायासाठी भेटल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट केले.जनता आक्रोश मोर्चाचे नेतृत्व विकी मोरे जिल्हाप्रमुख यांनी केली. यावेळी पीआरपी प्रदेश महामंत्री जगन सोनवणे हे देखील उपस्थित होते.

 

 

https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/361393361748766/?t=2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here