पुणे (प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले) – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लाॅकडाऊन सुरू झाले आणि घरात राहून करमणुकीच्या साधनांमध्ये बदल होऊ लागला. अनेक भारतीय कलाकार आपापली कलाकृती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपापली प्रतिभा दाखववण्याचा प्रयत्न करू लागले परंतू किती कलाकर्मीयांना यश मिळाले किंवा समाधान मिळावे याबद्दल काही साांगता येणार नाही. तसेच या महामारीमुळे जो लॉकडाऊन झाला त्याचा सर्वाधिक फटका करमणुकप्रधान व्यवसाय आणि त्यावर अवलंबुन असणाऱ्या कलाकार तंत्रज्ञ यांना बसला आहे. अजुनही त्याची भरपाई होऊ शकत नाही.
या लाॅकडाऊन कालावधीत अनेक प्रकारचे मोबाईल App मनोरांजन करण्यासाठी मोबाईल करीता उपलब्ध झाले परंतू त्याच्या कलाकृती सर्वांनी एकत्र बसून पाहण्या योग्य नाहीतच तसेच जास्तीत जास्त मोबाईल App करीता दरमहा मासिक फी भरुनच पहावे लागतात. उपलब्ध असलेले सवा मोबाईल App अनेक भाषांमधील कलाककृती एकाच App वर उपलब्ध आहेत. परंतु मराठी कलाकृती असलेले कोर्तेही मोबाईल App उपलब्ध नव्हतेआजही नाही. आम्ही स्टार फाईव्ह डाॅट लाईव या मोबाईल App च्या माध्यमातून ही करमणुकीची पोकळी भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व भाग कलागुणांनी भरगच्च आहे. अनेक कलाकार / कलाकर्मी यांनी संधी मिळताच त्याचे सोनं केले आहे.
तरीही अनेक कलाकर्मी आजही योग्य सांधीची वाट पहात आहेत. एक विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध नाही याचा विचार करून अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांच्या सहयोगातून स्टार फाईव्ह डाॅट लाईव हे मोबाईल appजानेवारी 2021 मध्ये सर्वांना उपलब्ध करून देणार आहोत. स्टार फाईव्ह डाॅट लाईव या app मध्ये आम्ही एकमेव मराठी भाषेतीलच कार्यक्रम दाखवणार आहोत यामध्ये वेबमसरीज, शॉर्ट फिल्म, गाणे,अल्बम, एकपात्री प्रयोग (स्टण्ड अप शो), चित्रपटाचे प्रोमोशन तसेच रेमसपी शो, कथाकथन आणि कविता वाचन या सर्व कलाकृती प्रदर्शित करणार आहोत.
स्टार फाईव्ह डाॅट लाईव हे मोबाईल app सर्व मोबाईल धारकाांना मोफत उपलब्ध करून देणार आहोत तसेच स्टार फाईव्ह डाॅट लाईव या app वर प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टकरीता पर विव्ह प्रमाणे पैसे आहोतच त्याहीपेक्षा ज्या कलाकृतींना जास्तीत जास्त पाहिले जाईल म्हणजेच ज्यांचे विव्ह सहा महिन्याच्या कालावधीत जास्त होणार त्यांना रोख रक्कमेचे पारितोषिक देणार आहोत.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या सहयोगातून सदर पारितोषिक वितरण कार्यक्रम करण्यात येणार असून सर्व कलाकृती आणि कलाकर्मी यांचा सन्मान करणार आहोत. महाराष्ट्रातील मराठमोळ्या कलाकर्मी यांना त्यांचे कलागुण दाखविण्यासाठी ही नामी सुवर्ण संधी आहे.
तसेच आम्ही महाराष्ट्राच्या लेखक/ कवी यांचे करीता विभागवार / जिल्हा पातळीवर आमचे तंत्रज्ञ / स्टुडिओ उपलब्ध करून देणार आहोत.तसेच रेसिपी / कुकींग स्कील करीता आमच्या तंत्रज्ञाच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात येणार आहे. ज्याांनी आजपर्यंत शुटिंग केलेले असेल तर ते तयार शो सुध्दा स्टार फाईव्ह डाॅट लाईव या मोबाईल app प्रदर्शित करणार आहोत ते तयार करणारे निर्माता/ कलाकर्मी यांना उत्पन्नाचे नवे साधन देणार आहोत.







