वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – समुद्रपूर /हिंगणघाट रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्था पुलगावद्वारा संचालित मुक्ताबाई विद्यालय समुद्रपूर येथील मनोज बाचले कलाशिक्षक तसेच संजय गांधी स्मृती विद्या मंदिर, हिंगणघाट येथील कलाशिक्षक अरविंद दहापुते यांनी जगावर आलेल्या या महामारीच्या संकटात बरेच ठिकाणी आपण स्वतः जीवाची पर्वा न करता घरदार विसरून जनतेस अभिप्रेत असलेल्या खरा मानवधर्म जागवत अविरतपणे लढा दिला. आलेल्या संकटाला न घाबरता त्यांच्याशी ताठ मानेने हे कार्य देशासाठी व महाराष्ट्रासाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरले आहे.
काम नाही तर कर्तव्य या जाणिवेतून त्यांच्याकडून होत असलेले हे कार्य कमी नाही. आपले हे कार्य महाराष्ट्राची जनता विसरू शकणार नाही. आपल्या या असामान्य कार्यकर्तृत्वाची दखल घेत महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे यांच्या वतीने आपल्या कार्याची दखल घेत यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महामंडळातर्फे त्यांच्या सेवारुपी कार्याचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.








