जळगाव (संपादक सुनिल पाटील) – १२ आकडी नंबर रजिस्टर करा , तुमचे रेशनदुकानदाराकडून लिहून आणा, शिक्के मारुंन आणा, दुकानदार जागेवर भेटत नाही, भेटला तर शिक्का मारत नाहीं. तहसील कार्यालय पुरवठा खात्याची जळगावची अरेरावीची भाषा, येथील कर्मचारी गरीब अशिक्षित महिलांशी अरेरावीने वागतात, हाकलून देतात, नीट उत्तर देत नाही , गरीब गरजू लोकना अक्षरशः हाकलून देतात, उध्दट भाषेचा वापर तहसील कार्यालयात होत आहे, अशी एक ना विविध अडचणी केवळ रेशन घेण्यासाठीच्या बारा आकड्यांच्या घोळामुळे सुरु झाल्या आहेत. हा घोळ थांबवून ही व्यवस्था सुव्यवस्थित करावी या मागणीसाठी अल्पसंख्याक सेवा संघटनांनी निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, 12 आकडी देण्यासाठी देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरचामाणूस एकच दिवसासाठी अमळनेरहुन जळगावला लॅपटॉप घेऊन येतो. हा माणूस फक्त एक दिवस सोमवारी येतो, दोन तास तीन,थांबतो ज्यांचे दुकानदारांचे शिक्के आहेत अशांना 12 आकडी नंबर कडून देतो, असा अजब कारभार जळगाव तहसील पूरवठा विभागात सुरू आहे.
धान्य घेण्यासाठी आता बारा आकडीचा घोळ सुरू आहे. गरिबी त्यात लॉकडाऊन, धंदा नही , हाताला काम नाही अशावेळेस अधिकाऱ्यांचा हा १२ आकड्यांचा खेळ सुरु आहे. याबाबत सविस्तर मुद्द्यांसह प्रवीण महाजन अपर जिल्हाधिकारी यांची अल्पसंख्याक सेवा संघटनांनी भेट घेवुन सविस्तर चर्चा केली. निवेदन घेतल्यानंतर त्यांनी या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करु असे आश्वस्त केले. पदाधिकाऱ्यांसमक्ष पुरवठा अधिकारी यांना फोन करुन विचारणा केली. 
जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.सूर्यवंशी यांची ही या प्रतिनिधी मंडळाने भेट घेवुन निवेदन दिले. त्यांनी म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुढच्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यामध्ये सव्वाचार कोटी रुपयांचे अनुदान शासनाने दिले असून आमची शासन ला 26 कोटींची मागणी होती, तरी सव्वाचार कोटींचे धान्य वाटप लवकरच होणार असल्याचे आश्वासन दिले. 12 आकड्यांची समस्या सोडविण्यासाठी जळगाव शहरात 4 कॉम्पुटर व स्वतंत्र माणूस देणार असल्याचेही सांगितले व लवकर सर्व समस्यांचे निवारण होईल असे आश्वासन दिले.
यावेळी अल्पसंख्यांक सेवा संघाचे प्रदेशअध्यक्ष जहांगीर ए खान, जिल्हाध्यक्ष सलीम इनामदार, अब्दुल रउफ शेख सचिव, सौ. भावना ताई लोढा, आयशा बी शकील मणियार,सईदा बी, प्रदेश उपाध्यक्ष याकुब खान, (बांगी सहब) , गुलाम मिर्झा आदी उपस्थित होते.







