नवी मुंबई काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाची आढावा बैठक संपन्न

congress

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नेरुळ सेक्टर ४८ नवी मुंबई येथील कार्यालयात नवी मुंबई कॉंग्रेस कमिटी अनु जाती विभागाचे अध्यक्ष रत्नाकर कुदळे यांनी नवी मुंबई अनु जाती विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते सदर बैठक मा.सुजित यादव, प्रभारी ठाणे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीसाठी रत्नाकर कुदळे (अध्यक्ष नवी मुंबई अनु. जाती विभाग ), मा.एकनाथ तांडेल जेष्ट काँग्रेस नेते, मा. सुभाषजी पाखरे ( समन्वयक प्रदेश काँग्रेस कमिटी अनु. जाती विभाग सहनिरीक्षक ), मा.किशोरजी केदार, ( जेष्ठ काँग्रेस कामगार नेते ) सौ जयाजी कुदळे, आदी उपस्थित होते या वेळी नवी मुंबई शहरातील काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्यांसह अनेक महिला भगिनी यांनी बैठकीत आपले विचार व्यक्त केले तसेच या वेळी खालील पदाधिकाऱ्यांना नवी मुंबईतील विविध पदनियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले
राजेश अरुण माटे ( चिटणीस ), रमेश मुकुंदा नडगंम ( चिटणीस ), सिद्धार्थ गेनू कांबळे ( सरचिटणीस ) , सौ अनिता प्रणय सावंत, ( सरचिटणीस ) अँड. कल्पेश के थोरावडे ( सरचिटणीस ), सुनील भोजराज फुलझेले ( चिटणीस ), मोहन बाप्पू बनसोडे, ( उपाध्यक्ष ), युवराज कृष्णा खरात, सचिन सावंत ( चिटणीस )nerul-congress

 

 

या वेळी नवी मुंबई काँग्रेस कमिटी अनु. जाती विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या व आगामी राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा या वेळी घेण्यात आला तसेच काही महिन्यात येऊ घातलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूका बद्दल चर्चा करण्यात आली, वाढीव लाईट बिलांचा प्रश्न, बेरोजगार युवक युवतींसाठी आगामी काळात उद्योग व्यवसायासाठी मेळाव्याचे आयोजन करणे, शेतकरी व कामगार विरोधी कायदाच लढा आणखी तीव्र करण्याचा या वेळी ठरले त्याच प्रमाणे या दोन्ही कायद्यांच्या विरोधात सह्यांची मोहीम अधिक तीव्र करण्याचा मानस या वेळी करण्यात आला.

 

सदर बैठकीचे प्रास्ताविक नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रत्नाकर कुदळे यांनी केले बैठकीचे सूत्र संचालन सुनील कांबळे यांनी केले व अध्यक्षीय भाषणा नंतर राष्ट्रगीताने बैठकीची समाप्ती करण्यात आली.

navi-mumbai-congress

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here