जागर प्रतिष्ठानकडून ‘ जागर ‘ जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे शिक्षक, शिक्षकेतर व खुल्या गटासाठी आयोजन

jagar-patishthan-bhusawal

पारितोषिक प्राप्त व उत्कृष्ठ निबंधाचे प्रकाशन ‘ जागर ‘ पुस्तिकेत

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – येथील जागर प्रतिष्ठान चा पाचवा वर्धापन दिन व वाचन प्रेरणा दिनानिमित्त जळगाव जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही निबंध स्पर्धा तीन गटात आयोजित करण्यात आली असून प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय शिक्षकांसाठी शिक्षक हा असेल, शाळा / महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शिक्षकेतर गट तर वय वर्ष 18 वरील स्पर्धकांना खुल्या गटात सहभागी होता येईल. जागर प्रतिष्ठान वर्धापन दिनाचे औचित्य साधून पारितोषिक प्राप्त व उत्कृष्ठ निबंधाचे प्रकाशन ‘ जागर ‘ पुस्तिकेत करणार आहेत. स्पर्धेचे हे सलग दुसरे वर्ष आहे. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल.

 

 

पहिल्या शिक्षक गटकरिता
१ ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: बदल आणि आव्हाने, २ ) ऑनलाईन शिक्षण : उपाययोजना की अडचण व ३ ) कोरोनानंतरची शिक्षण क्षेत्रातील आव्हाने व शिक्षक विषय असतील.
दुसऱ्या शिक्षकेतर कर्मचारी गटकरीता

१ ) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळा / महाविद्यालय विकासातील भूमिका, २ ) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविषयीची ध्येय-धोरणे : एक चिंतन व ३ ) कोरोनाच्या संकटात कर्मचारी व विद्यार्थी संरक्षणार्थ माझी जबाबदारी विषय असतील तर वय वर्षे १८ वरील तिसऱ्या
खुल्या गटासाठी १ ) असा घडेल आत्मनिर्भर भारत…, २ ) सहिष्णुता : माणसातील माणुसकीचा शोध ! व ३ ) कोविड -१९ : आरोग्य विषयक जागरूकतेचा वस्तुपाठ विषय देण्यात आले आहेत.

 

 

स्पर्धक निबंध पोस्टाने जागर C/O राजपथ कोचिंग क्लासेस, भावसार पंचभवन, जामनेर रोड, भुसावळ येथे अथवा नियुक्त तालुका संपर्क प्रमुख यांचे कडे दिनांक ३१ नोव्हेंबर २०२० पर्यंत जमा करू शकतात. अधिक माहितीसाठी जिल्हा प्रकल्प प्रमुख जीवन महाजन ( ७५८८८ १५३८४ ) , जिल्हा समन्वयक सुनील वानखेडे ( ८५८८६ ८७९५५ ) व जिल्हा सहसमन्वय समाधान जाधव ( ९०२२४ ६४९८१ ) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक जागर प्रतिष्ठान व प्रायोजक साई जीवन सुपर शॉप, भुसावळ यांचे कडून करण्यात आले आहे. जागर निबंध स्पर्धा यशस्वितसाठी मार्गदर्शन समिती सदस्य उपशिक्षणाधिकारी विजय पवार, प्रा शैलेश राणे, संजय भटकर, मिरा जंगले, संदीप पाटील, प्रा श्रीकांत जोशी समन्वय समिती सदस्य योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, अमित चौधरी, निलेश पाटील, प्रा श्याम दुसाने, प्रा गणेश सूर्यवंशी, शैलेंद्र महाजन, जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. पंकज पाटील, उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, कोषाध्यक्ष हृषिकेश पवार, सचिव निलेश गुरूचल, कायदे तज्ज्ञ ऍड हरेश पाटील, संचालक पवन पाटील व गोकुळ सोनावणे परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here