कल्याणमध्ये अ‍ॅसिड हल्लय़ात सहा जखमी; दोघा महिलांची प्रकृती गंभीर

acid-attack

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कल्याण पूर्व भागामधील नेतिवलीमध्ये गुरूवारी दोन गटांत झालेल्या वादातून अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. त्यात सहाजण होरपळले असून दोन महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

नेतिवली येथे अबीद अन्सारी आणि रिंकू मंडल शेजारी राहतात. त्यांच्यात झोपडीच्या जागेवरून काही महिन्यांपासून वाद सुरू होते. या जागेत दोन्ही घरांतील मुले खेळत असताना त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. हाणामारीच्यावेळी एका गटाने दुसऱ्या गटावर अ‍ॅसिडहल्ला केला. त्यात मेहजबीन अन्सारी, ललिता विश्वकर्मा, टिंकू मंडल, रेणू मंडल, तब्बसून अन्सारी आणि तेथे हजर असलेल्या इतर महिला गंभीर जखमी झाल्या.

 

 

या गुन्ह्य़ाची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्यासह कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी हजर झाले. हाणामारीच्यावेळी अ‍ॅसिडचा वापर कोणत्या गटाने केला. ते कोठून आणण्यात आले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. अ‍ॅसिडहल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here