ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – घरासमोर शिवीगाळ कोणाला करतो, याचा जाब विचारणाऱ्या व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. त्याशिवाय घरोसमारे उभी असलेल्या चार चाकी वाहनाची तोडफोडही करण्यात आली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
काल रात्री 8 वाजताच्या सुमारास कल्याणजवळील वडवली परिसरात राहणारे नयन पाटील त्यांच्या घरी होते. घरासमोर दोन ते तीन जण दारु पिऊन धिंगाणा घालत होते. त्यांचा आवाज ऐकून नयन घराबाहेर पडले. धिंगाणा घालणारे तरुण हे ओळखीचे असल्याने त्यांनी त्या तरुणांना तिथून जाण्यास सांगितले. याआधीही नयन यांचे धिंगाणा घालणाऱ्या तरुणांसोबत वाद झाले होते.
मात्र, काल रात्री नयन यांनी या तरुणांना फक्त घरासमोरुन जाण्यास सांगितले. त्यावर या तरुणांनी नयन यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा शीवीगा का करता असा जाब नयन यांनी विचारला. त्याचा या तरुणांना इतका राग आला की, त्यांनी नयनवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात नयन पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या कल्याणच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी रवी पाटील, ऋषी भोईर आणि इतर दोन तरुणांच्या विरोधात प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.







