केळी उत्पादक शेतकऱ्यांचा हक्क महाविकास आघाडी सरकारला द्यावाच लागेल – खासदार रक्षाताई खडसे

rakshatai-khadse

चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) – केळी पिक विमा तसेच केळी पिक उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणीविषयी जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टी,व केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने दि.9 नोव्हें.2020 सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी,केळी पिक विमा संदर्भातील चुकीच्या धोरणाविरोधात ‘भव्य किसान मोर्चा/आंदोलन’केले जाणार आहे,म्हणून या आंदोलनाच्या नियोजन संदर्भात आज दि.6 नोव्हें.2020 शुक्रवार रोजी प्रदेश चिटणीस तथा खासदार रक्षाताई खडसे,उ.महा.किसान मोर्चा संयोजक सुरेशजी धनके,कृषीभुषण नारायणबापू चौधरी तसेच चोपडा ता.पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वर्डी-गोरगावले बु.जि.प.गटाच्या बैठकी प्रसंगी खा. रक्षाताई खडसे यांनी जास्तित जास्त केळी उत्पादक शेतकर्‍यांनी दि.9 नोव्हे.2020 सोमवारी होणार्‍या जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित ‘भव्य किसान मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

 

 

याप्रसंगी उ.महा.किसान मोर्चा संयोजक सुरेशजी धनके,कृषीभुषण नारायणबापू चौधरी,रावेर लोकसभा विस्तारक डाॅ.विजयजी धांडे,जिल्हा उपाध्यक्ष पद्माकरभाऊ महाजन,मा.जि.प.सदस्य भरतभाऊ महाजन,जेष्ठनेते शांतारामआबा पाटील,जेष्ठ नेते चंद्रशेखरदादा पाटील,मा.पं.सभापती आत्माराम म्हाळके,जिल्हा चिटणीस राकेशदादा पाटील,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,ता.उपाध्यक्ष देविदास पाटील,योगराज पाटील,सरचिटणीस हनुमंतराव महाजन,भरत सोनगिरे सर,ता.शेतकी संघाचे संचालक हिंमतराव पाटील,बाजार समिती संचालक मगन बाविस्कर सर,ता.युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील,उपाध्यक्ष रावसाहेब पाटील,चोसाका संचालक अनिल पाटील,आदर्श गाव हातेड बु.चे सरपंचडाॅ.विक्की सनेर,मिलिंद पाटील,विजय बाविस्कर,कांतिलाल पाटील सर,बुथप्रमख गुरुदास पाटील,प्रविण पाटील,भागवत महाजन,सदाननंद पटील,खडगाव येथील डाॅ.धननराज पटील,देविदास पाटील,भूषण महाजन,शरद पाटील वर्डी,गोरगावले,वडगाव,खडगाव,रुखणखेडा,तावसे,आडगाव,कोळंबा,वटार,सुटकार,घुमावल बु,घुमावल खु.,खेडीभोकरी,पुनगाव आदि गावातील केळी उत्पादक शेतकरी व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here