‘तिने’ ३ महिन्यांत केली ३ लग्ने

marriage

औरंगाबाद (प्रतिनिधी) – तीन महिन्यांत तीन लग्न करून त्यांच्याकडील दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या २७ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाउनच्या काळात ती आणि तिचा पती बेरोजगार झाला होता. त्यामुळे त्यांनी हा मार्ग अवलंबल्याची माहिती समोर आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन महिन्यांत तीन जणांनी लग्न केली. मात्र, त्यांच्याकडील दागिने लुटून महिला पसार झाली. विजया असे या महिलेचे नाव असून, ती औरंगाबादमधील मुकुंदवाडी परिसरात राहते. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात तिचा आणि तिच्या पतीचा रोजगार हिरावला गेला. त्यामुळे त्यांनी हा गैरमार्ग अवलंबला.

 

नाशिक जिल्ह्यातील एका तरुणामुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला. आपल्या पत्नीचा शोध घेत असताना, तिने नुकतेच अन्य एका तरुणाशी लग्न केल्याचे त्याला समजले. या तरुणाकडे ती जवळपास पंधरा दिवस राहिली. त्यानंतर ती पळून गेली. तिने नंतर रायगडमधील कर्जत तालुक्यातील संदीप नावाच्या तरुणाशी लग्न केले. त्यानंतर तिने पश्चिम महाराष्ट्रातील एका तरुणाशी लग्न केले. हे तिचे तिसरे लग्न होते. लग्नासाठी मुलींच्या शोधात असलेल्या तरुणांना जाळ्यात ओढून लग्न करायचे आणि त्यांना लुटण्याचे काम हे करत होते. या रॅकेटमध्ये महिला आणि तिचा पती सामील झाला होता. लग्न ठरल्यानंतर ते लग्नासाठी झालेला खर्च आणि लग्नानंतर काही दिवसांतच ते पतीचे दागिने घेऊन पसार व्हायचे, अशी माहिती उघडकीस आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here