विटा पोलिसांनी फिर्यादीस घरफोडीचा सोन्याचा 100% मुद्देमाल परत केला

vita-police

सांगली (प्रतिनिधी शरद मोरे) – आरोपींनी घरफोडी करून जेवढा सोन्याचा मुद्देमाल चोरून नेला. तो सगळा आहे तसा पुन्हा आहे तसा संबंधितांना परत करण्याची गौरवास्पद कामगिरी विटा पोलिसांनी करून दाखवली आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की खानापूर तालुक्यातील माहुली गावात दोन महिन्यांपूर्वी 20 ऑगस्टच्या मध्यरात्री गणेश शामराव माने यांच्या घरात त्यांच्या पत्नी अश्विनी आणि मजुरीचे काम करीत असलेल्या श्याम तारासिंग राठोड या दोघांनी संगनमत करून तब्बल 6 लाख 34 हजार 400 रुपयांचा सोने-चांदीचे दागिने असलेला मुद्देमाल चोरून नेला. यांत 29 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या पाटल्या, 73 ग्रॅम च्या आठ सोन्याच्या बांगड्या, 58 ग्रॅम ते 2 सोन्याचे गंठण, 69 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या बोरमाळा,12 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या साखळ्या, साडेतीन ग्रॅमचे सोन्याचे झुबेजोड, अडीच ग्रॅमचे दोन सोन्याचे टॉप्सचा या जिन्नसांचा समावेश होता.

 

याबाबत 22 ऑगस्ट रोजी गणेश माने यांनी विटा पोलिसात पत्नी आणि मजूर राठोड याच्याविरोधात फिर्याद दिली होती. विटा पोलिसांनी या दोघांवरही कलम -457, 380, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विटाचे पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण केला आणि आरोपींकडून संबंधित सोन्याचे जिन्नस असलेला मुद्देमाल जप्त केला. हा जप्त किमती मुद्देमाल सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 6 लाख 34 हजार आणि 400/- रोख रुपयेचा मुद्देमाल विटा न्यायालयाच्या आदेशाने आज शुक्रवारी फिर्यादीचे गणेशचे वडील शामराव विठ्ठल माने, (रा. माहूली, ता. खानापूर, जि. सांगली) यांना पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्याहस्ते ताब्यात देण्यात आला. शंभर टक्के मुद्देमाल पुनर्प्राप्त करून संबंधित फिर्यादीला परत देण्याची विटा पोलीस ठाण्याच्या आजवर च्या इतिहासात कदाचित ही पहिलीच घटना असावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here