पुणे (प्रतिनिधी मनिष नेरुरकर) – २०२० दसऱ्याचा शुभदिनी अखिल चर्मकार समाजसेवा फाऊंडेशन(कार्यक्षेत्र संपूर्ण भारत) ची स्थापना झाली.सदर संस्था चर्मकार समाजाच्या समस्या,प्रश्न तसेच समाजहिताची कामे करणार आहे.संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्य विस्तार समारंभ आणि २ रीसर्वसाधारण सभा आज चाकण येथे मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडली .सभेचे उपस्थित मान्यवर श्री.प्रमोद महाजन,प्रमुख पाहुणे हे रिबर्थ फाऊंडेशन पुणे चे ब्रँड अँबॅसिडर आहेत.समाजात अवयव दान समाज जागृतीच्या कामात त्यांची भरीव कामगिरी आहे.
तळागाळातील समाज बांधवाना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यात सकारात्मक आणि सामाजिक बदल घडविण्यासाठी संस्था कार्य करणार आहे.समाजबांधवांसाठी रोजगार,शिक्षण,महिला सक्षमीकरण,समाजबांधवांवर होणारे अत्याचार,छळ,आरोग्य आणि पर्यावरण रक्षण या सारख्या विविध मुद्य्यांवर संस्था कार्यरत राहणार आहे.असे प्रतिपादन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दिनेश जाधव यांनी आज चाकण येथे झालेल्या संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्य विस्तार समारंभ प्रसंगी केले.
संत रविदास महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्था चर्मकार समाजाच्या हितासाठी कटिबद्ध आहे असे वक्तव्य संस्थेचे प्रदेशाध्यक्ष श्री.गजानन शिंदे यांनी केले.त्यांनी संस्थेचे नियम व कार्यप्रणाली या प्रसंगी जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितली.
अखिल चर्मकार समाजसेवा फाऊंडेशन कार्यक्षेत्र संपूर्ण भारत याचा पदाधिकारी विस्तार हा पुढील प्रमाणे आहे.संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दिनेश जाधव,श्री.गजानन शिंदे (राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष),श्रीमती .सुरेखा सुर्वे(राष्ट्रीय महिला प्रदेश अध्यक्ष),श्री.मीरासाहेब सखरे(राष्ट्रीय उपाध्यक्ष),श्री.दत्तात्रय पांडुरंग कदम (राष्ट्रीय महासचिव),श्री.दत्ता शिंदे (राष्ट्रीय खजिनदार)
संस्थेचे काम भारतभर पोहचावे या उद्देशाने पद वाटप खालीलप्रमाणे करण्यात आलीत:
१.श्री.राकेश काळे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष),श्री.भीमराव देसाई (राष्ट्रीय प्रमुख सल्लागार),श्रीमती.सुनीता कसबे (राष्ट्रीय प्रवक्ता ),श्री.तानाजी कांबळे (राष्ट्रीय प्रमुख सल्लागार),श्री.मनिष नेरुरकर (राष्ट्रीय मीडिया प्रभारी),सौ.संध्या गायकवाड (महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष ),श्री.सुजय जाधव (महाराष्ट्र राज्य सचिव ),सौ.धन्वंतरी कांबळे (महाराष्ट्र राज्य महिला सचिव ),श्री.गजानन लिंबोरे (महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष),सौ.सुनीता तिखे (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष),श्री.पितांबर शिंदे (महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष),सौ.शैलजा गुर्जर (पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष),श्री.रोहिदास पगारे (ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख),सौ.रंजनाताई जगताप(पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख),श्री.राहुल तिखे (पुणे जिल्हा संघटक ),श्रीमती.सरस्वती जगताप (चाकण शहर संपर्क प्रमुख ),श्री.सुनील तिखे (पुणे जिल्हा संघटक ),सौ.सारिका शिंदे (महाराष्ट्र राज्य युवती अध्यक्ष),श्री.चित्तरंजन महाजन (महाराष्ट्र राज्य सक्रिय सदस्य),श्री.दत्तात्रय पवार (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ).संस्थेची ध्येय आणि धोरण यांची पायमल्ली न करता चर्मकार समाज कार्या साठी स्वतःला वाहून घेत आहे अशी ग्वाही याप्रसंगी या सर्वानी दिली.
सदर समारंभात वरील सर्व पदादिकार्यांना संस्थेचे ओळखपत्र व नियुक्ती पात्र देण्यात आले.सौ.सुनीता कसबे याना महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि श्री.मनिष नेरुरकर याना गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ द्वारा डॉक्टरेट हे मानद मिळाल्याबद्दल संस्थे तर्फे त्यांचे हि सत्कार याप्रसंगी करण्यात आले. संस्थेचे श्री.सुजय जाधव (महाराष्ट्र राज्य सचिव ) यांच्या तर्फे मान्यवरांचे आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले.







