भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय गीणुजन परिषद च्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते त्यामध्ये जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा येथील सामाजिक कार्यकर्ते दशरथ सुपडू पाटील यांना कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
त्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात करण्यात येते, दशरथ पाटील यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवुन कोरोनाच्या महामारी संकटात केलेली मदत असे अनेक उल्लेखनीय केल्या बद्दल त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे दशरथ सुपडू पाटील केकतनिभोरा यांना राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार जामनेर तालुक्यातील पोलीस स्टेशन पीआय प्रताप इंगळे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला 
उपस्थित केकत निंभोरा येथील पोलीस पाटील गोरखनाथ बहिरे , मानव संरक्षण समिती जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष योगेश पाटील, श्रीराम पाटील, निवृत्ती पाटील गौरव पंडित अक्षय भिडे, उपस्थित होते हा पुरस्कार राम राज्य ग्रुप, केकतनिभोरा येथील सर्व मित्र मंडळ , गावकऱ्यांच्या सहकार्याने तालुक्यातील शिक्षण मित्रमंडळी, तालुक्यातील पत्रकार यांच्यासह यांनी हा हा पुरस्कार सर्वांच्या सहकार्याने मिळाला








