शिवाजीनगर परिसरात करण्यात आले आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप

धर्मरथ फाउंडेशन तसेच जिल्हाप्रशासन व रेडक्रॉस जळगाव यांच्या सहकार्याने संयुक्त उपक्रम

जळगाव (विनायक पाटील) – आज 5 जुलै 2020 रोजी पुष्पांजली कॉलनी , धनाजी काळे नगर , भुरे मामलेदार प्लॉट परिसर , हुडको परीसरात धर्मरथ फाउंडेशनच्या वतीने कोरोना सारख्या महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांना 1700 बोटलचे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकरता आर्सेनिक अल्बम – 30 या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले, जेणेकरून नागरिकांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास मदत होईल यावेळी धर्मरथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील,संतोषदादा भिताडे,हिरामण भाऊ तरटे,निशांत भाऊ पाटील, भगवान भाऊ सोनवणे,धर्मेंद्र चौधरी,तुषार सूर्यवंशी,सागर बडगुजर,प्रमोद महांगडे आदी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here