कल्याण (राजेंद्र रहाळकर) – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून थेट कोव्हीड 19 डेडिकेटेड रुग्णालयांना भेट देत आहेत. कोरोनाच्या संसर्गातीत व्यक्तींच्या समोर जाऊन त्यांची व रुग्णालयातील मेडिकल , पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांची विचारपूस करत आहेत, त्यांची आस्थेने चौकशी करून त्यांची दखल घेत आहे.
आजच्या घडीला अशा डेडिकेटेड रुग्णालयांच्या परिसरात उभं राहण्यासही भले भले कचरत आहेत. तिथे फडणावीसांसारखा नेता जातीने सामोरा जात आहे. हे सर्वसामान्य जनतेकरिता व सर्व प्रशासनिक , मेडिकल कोरोना वॉरीयर्ससाठी उत्साहवर्धक बाब ठरत आहे. महाराष्ट्राच्या लढवय्या परंपरेला साजेसे वर्णन या धीरोदात्त नेत्याकडून होत असल्याने सर्वत्र त्यांचे आभार मानले जात आहे. गेल्या तीन ते चार दिवसात श्री.फडणवीस यांनी परवा सोलापूर , पुणे, काल पनवेल , नवी मुंबई आणि आज कल्याण , उल्हासनगर , भिवंडी, असा झंझावाती दौरा केला आहे. वास्तविक ठिकाणी जाऊन रुग्ण व वैद्यकिय स्टाफशी बोलून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. इतरांसारखं व्हर्च्युअल – व्हर्च्युअल चा खेळ करून किंवा VC – VC चा खेळ करूनही चाललं असतं किंवा अशाच इतरांसारखंच कुठेतरी हॉटेलवर , रेस्टहाऊसवर किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसूनही शहरांची पाहणी केल्याचे दाखवून देता आलं असतं. पण श्री. फडणवीस हे महाराष्ट्राच्या धीरोदात्त नेत्याचे उदाहरण म्हणून थेट कोव्हीड 19 डेडिकेटेड रुग्णालयांत कोरोनाच्या संसर्गातील जनतेच्या थेट समोर जात आहेत, ही बाब महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे.
Home Uncategorized महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची कल्याण शहरात कोव्हीड 19 डेडिकेटेड रुग्णालयास...







