शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या 28 व्या वर्धापन दिना निमित्त वडाळी ता शहादा जि नंदुरबार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स ,नर्स कंपाउडर आरोग्य सेवकांचा कोरोना च्या भयंकर महामारीच्या काळात गेल्या 7 ते 8 महिन्या पासून वडाळी परिसरातील ग्रामस्थांनाच्या सेवेत तत्पर सेवा देण्याचे कार्य डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी केले आहे म्हणून समता परिषदेच्या 28 व्या वर्धापन दिना निमित्त कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सत्कार कोंढावळ शाखा व नंदुरबार जिल्हा समता परिषदेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरव् करण्यात आला तसेच रुग्नाना फळ वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला
या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी वडाळी ग्राम पंचायतीचे सरपंच हिम्मत सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून विविध कार्यकारी सोसायटीचे चेरमन राजेन्द्र सोमजी सोनवने , कोंढावळ येथील महात्मा गांधी तंटा मुक्ती अध्यक्ष दिपक अहिरे, विकास इग्लिश मीडियम स्कुल चे मुख्यध्यापक चन्द्रमणी रायसिंग ,मा शालेय शिक्षण समिती अध्यक्ष महेंद्र जगताप ,समता परिषद युवा आघाडी शहादा तालुका अध्यक्ष प्रवीण माळी , सामाजिक कार्यकर्ते कैलास सैंदाने सर, सुनील माळी पत्रकार ,आदि मान्यवर उपस्थित होते
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष , अन्न नागरी पुरवठा ,संरक्षण मंत्री छगनराव जी भुजबळ यांनी बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची 1 नोव्हेंबर 1992 साली स्थापना केली संस्थापक छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतुंन छत्रपति शिवाजी महाराज महात्मा जोतीराव फुले सावित्रीबाई फुले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांच्या विचारांना जनसामान्यातील सामाजिक समता टिकवण्यासाठी अन्यायाविरोधात संविधानिक पद्धतीने संघर्ष करण्या करिता समता परिषद संपूर्ण महाराट्र सह देशात मोठ्या ताकतीने कार्य करीत आहे 
अन्न नागरी पुरवठा सरंक्षण मंत्री महा राज्य तथा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शना खाली आदिवासी बहुल जिल्ह्यात शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या विचारांची जोत सर्व जिल्ह्यातील शेवटच्या जनमांसा पर्यन्त पोहचवण्याचे काम समता परिषदेच्या माध्यमाने करणार आहोत आणि सर्व सामन्यांच्या अन्यया विरोधा लढा उभारून त्यांना न्याय देण्याचे कार्य समता परिषद माध्यमाने करणार असल्याचे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे यांनी या कार्यक्रमा निम्मित सांगितले
या कार्यक्रमाचे आयोजन समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे यांनी केले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातिल आरोग्य अधिकारी डॉ जी आर पाटील ,एस एस परदेशी ,आर आर वाघ व्ही सी पावरा,एस एम निकूम, एन डी चव्हाण ,एन डी वाडिले ,वाहन चालक निंबा महाजन आदिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास सैदाने यांनी केले तर आभार प्रवीण माळी यांनी मानले.







