सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याला पडले भगदाड
शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा ते खरवड रस्ता मागील अनेक वर्ष पासून खरवड ते प्रकाशा दरम्यान असलेल्या भेडवा पुला जवळील अर्धवट सोडून देण्यात आलेले काम अद्याप ही पूर्ण होतांना दिसत नाही प्रकाशा पासून दोन किमी पर्यंत केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे केल्याचे दिसून येत आहे.हा रस्ता प्रकाशा गावा पासून तर बोरद,तऱ्हावद, धडगावं आदी. गावांना जोडला जाणार दुवा मानला जात असतो. परन्तु या रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये काटेरी झाडी वाढल्याने व रस्त्यावर ठिक ठिकाणी मोठं मोठे भगदाड पडल्याने वाहन धारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.
पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघातात वाढ
भेडवा पुलाच संरक्षण कठडे नसल्याने अपघातामध्ये वाढ झाली आहे त्यात मागील एका चिमकुल्याचा पुलावरून खाली पडून आपला जीव गमवावा लागला आहे.
मालदा करडे लाखापूर तुळाजा गोडाळा बोरद आदी भागातून मोठ्या प्रमाणा मध्ये मजूर हे नंदुरबार कडे कामानिमित्त ये- जा करत असतात मिर्ची, ज्वारी, सोयाबिन, कपाशी, यां खरीप पिकांना काढणीला जोरदार सुरवात झाली असली तरी देखील दोन पैसे जास्त मिळावे या आशेने ग्रामीण भागातील मजूर सद्या नंदुरबार शेहराकडे वळत असल्याने त्या अनुषंगाने खरवड ते प्रकाशा हा रस्ता शॉटकट आहे म्हणून मजूर घेऊन वाहन धारक दरोरोज रस्त्यावरून ये जा करीत असतात मजुरांना संध्याकाळी कामावरून परत येताना रात्र होत असते रात्रीच्या वेळेस वाहन धारकांनारकांना काटेरी झाडे झुडपातुन तसेच रस्त्यावर ठिक ठिकाणी मोठे मोठे भगधाड असल्याने त्यात भेडवा पुलावर संरक्षण कठळे नसल्याने जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागत आहे 
संबंधित प्रशासन मोठा अपघात होण्याची वाट तर पहात नाही ना?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.अर्धवट राहिलेले काम त्वरित पूर्ण करण्यात यावे व निकृष्ट झालेल्या कामाची तात्काळ चौकशी होऊन संबंधित कंत्राक दारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी मजूर, व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
नित्कृष्ट दर्जाची कामाची चौकशी करण्यात यावी वंचित बहुजन आघाडीची मागणी
प्रकाशा (ता शहादा) पासून दोन अडीच कि मी पर्यंत झालेले निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने छोटे मोठे अपघात हे रोजचेच झाले आहे सदर रस्ता हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असून त्यात दुतर्फा काटेरी झाडे वाढल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी प्रशासनाने या कडे लक्ष वेधून चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.








