मुंबई (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विधान परिषद सदस्य पदावर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून महाराष्ट्रातील व देशातील ख्यातनाम गायक आंबेडकरी चळवळीचे खंदे अनुयायी आनंद प्रल्हाद शिंदे यांची नियुक्ती जवळपास निश्चित झालेली असून त्याबद्दल त्यांना अध्यक्ष:- युवा सन्मान प्रतिष्ठाण सामाजिक संस्था” अध्यक्ष:- ठाणे शहर युवा आघाडी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सामाजिक कार्यकर्ते भिम पँथर साईनाथ खरात यांनी सुरुवातीलाच शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त केले
महाराष्ट्रातील ख्यातनाम लोक गायक प्रल्हाद शिंदे यांचे पुत्र असणाऱ्या आनंद शिंदे यांनी वडिलांच्या परंपरेला पुढे घेऊन जात महाराष्ट्रामध्ये लोकगीत, भीमगीतांनी धुमाकूळ घालत गायक म्हणून सर्वोच्च लोकप्रियता मिळविली. आज केवळ त्यांच्या गायनाचा साठी हजारोंचा जमाव जमा होतो ही त्यांच्या गायकीची जादू. आनंद शिंदे यांनी व्यवसायिक गायक म्हणून मराठी हिंदी सिनेसृष्टीमध्ये गीते गायलेली आहेत. 1980च्या दशकामध्ये त्यांच्या लोक गीतांनी विश्वविक्रम देखील केलेला आहे. त्यांच्या या संपूर्ण कार्याची दखल घेत राज्यपाल नियुक्त कला क्षेत्रातून आमदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्याचे सुनिश्चित झालेले आहे.
आनंद शिंदे यांच्या नियुक्तीने अनेकांना आनंद झाला असला तरी काही लोक मात्र त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. टीकाकारांनी टीका करत असताना आनंद शिंदे यांचे आंबेडकरी चळवळीतील अनन्यसाधारण योगदान कायम लक्षात घ्यावे. आनंद शिंदे हे हाडाचे आंबेडकरी अनुयायी व आंबेडकरी चळवळीचे पाईक आहेत. केवळ पोटभरू गायकी करनारे ते नाहीत हे मी येथे अतिशय प्रामाणिक आणि प्रांजळपणे या ठिकाणी नमूद करु इच्छितो. टेलिव्हिजनवर विविध वाहिन्यांवर आज बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यांचा जो कार्यक्रम होतो त्याला आनंद शिंदे हेच कारणीभूत आहेत कारण ती त्यांची तपश्चर्या आहे आणि तुमचे आवडते गाणं गा असं सांगितल्यानंतर ते आवर्जून बाबासाहेब आंबेडकर यांचेच गीत गात असतात.
आनंद शिंदे यांनी आंबेडकरी राजकीय व सामाजिक चळवळीमध्ये कायमच सक्रिय सहभाग नोंदवला आहे. एक आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांची सातत्याने समाजाप्रती राजकीय व सामाजिक तळमळ बघत आलेलो आहे. त्यांनी चळवळीची नाळ सोडलेली नाही ज्या वेळेला त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती ती नाकारून त्यांनी बहुजन समाज पक्षाकडूनच चळवळीशी बांधिलकी म्हणून आमदारकीची निवडणूक लढवलेली आहे. त्यानंतर ते रामदास आठवले यांच्या बरोबर सुरुवातीपासूनच होते पुढे त्यांनी चळवळीतील झुंजार नेते आणि त्यांचे अतिशय खास मित्र असणारे मनोजभाई संसारे यांच्या समवेत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यासाठी व त्याची बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे.
अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे झाले तर शिर्डी येथे सागर शेजवळ या तरुणाचे बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे लावले म्हणून झालेल्या हत्तेने व्यथित होऊन त्याविरुद्ध शिर्डी येथे निघालेल्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये प्रमुख आयोजकांची भूमिका आनंद शिंदे यांनी बजावलेली आहे.. दुसरे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे भीमा-कोरेगाव याठिकाणी झालेल्या हल्ल्याच्या वेळी देखील ते तितकेच व्यथित झाले होते. त्यावेळी देखील त्यांनी मनोजभाई संसारे अर्जुन डांगळे प्रा. जोगेंद्र कवाडे नानासाहेब इंदीसे व इतर लोकांना घेऊन महाराष्ट्र भर संविधान परिवार यामार्फत जनजागृतीपर सभा घेतले व मुंबई येथे सर्वात पहिला भीमा-कोरेगाव प्रकरणातला महामोर्चा आयोजित केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाकडून खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी आमदारकीसाठी विचारले होते आणि त्यास नकार दिल्यानंतर देखील सरकार बद्दल चांगलं बोलून प्रचार-प्रसार करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचे पॅकेज देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते त्यावेळी त्यांनी त्याला नकार दिला होता नंतर विधानसभेला देखील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना ऑफर केल्या होत्या पण त्यांनी त्यासही नकार दिला होता. तो नकार त्यांनी जाहीररित्या दिला होता. त्यामुळे त्यांच्या सामाजिक बांधिलकी बद्दल आमदारकीच्या माध्यमातून कोणीही प्रश्न उभे करू नये असे मला वाटते.
कलाकारांचे स्वतःचे अशी खूप प्रश्न शिल्लक आहेत. आजही आपण पाहतोय लॉकडाऊन कालावधीमध्ये अनेक कलावंत उपासमारीची आयुष्य जगत आहेत. कलाकारांना राजकीय पक्षांशिवाय कार्यक्रम मिळत नाहीत. इंटरनेटच्या कालावधीमुळे कलाकारांची आणखीन मोठे नुकसान झालेले आहे. त्यांचेही प्रश्न समस्या विधिमंडळावर मांडून त्यांची सोडवणूक करून घेण्यासाठी सेच समाजावरील होणार्या अन्याय अत्याचाराविरुद्ध सामाजिक जाणिवेतून आवाज उठवुन ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आनंद शिंदे यांची आमदारकी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे शक्यतो आपण त्यांना शुभेच्छा द्यावे .असा टोला ही बजावला
राहता राहिला प्रश्न पूर्वाश्रमीच्या काँग्रेस व विद्यमान राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर जवळपास सर्वच रिपब्लिकन व आंबेडकरी नेत्यांनी खासदारक्या आमदारक्या व मंत्रिपद उपभोगली आहेत. त्यामुळे त्यांची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली ही बाब पुढे करून त्यांना विरोध करणे गैर आहे.. आनंद शिंदे यांच्या आमदारी मुळे भिम शाहीर लोक कलावंत यांचे प्रश्न नक्कीच मार्ग लागतील असा दावा साईनाथ खरात यांनी बोलत असताना केला.







