आजचे पंचांग, राशिभविष्य : सोमवार, ०९ नोव्हेंबर २०२०

panchang

भारतीय सौर १८ कार्तिक शके १९४२, निज आश्विन कृष्ण अष्टमी सकाळी ६.५० पर्यंत, नवमी उत्तररात्री ५.२७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आश्लेषा सकाळी ८.४१ पर्यंत, चंद्रराशी : कर्क सकाळी ८.४१ पर्यंत, सूर्यनक्षत्र: विशाखा, सूर्योदय: सकाळी ६.४३, सूर्यास्त: सायं. ६.०१, चंद्रोदय: उत्तररात्री १.२८, चंद्रास्त: दुपारी १.५३.

 

आजचे शुभ मुहूर्त :
अभिजित मुहूर्त : सकाळी ११ वाजून ४३ मिनिटे ते दुपारी १२ वाजून २६ मिनिटे.
विजय मुहूर्त : दुपारी ०१ वाजून ५३ मिनिटे ते ०२ वाजून ३७ मिनिटे
निशिथ काळ : रात्रौ ११ वाजून ३९ मिनिटे ते १२ वाजून ३१ मिनिटे.

आजचे अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सकाळी ०७ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत.
यमगंड : सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते दुपारी १२ वाजेपर्यंत.
गुलिक काळ : दुपारी ०१ वाजून ३० मिनिटे ते दुपारी ०३ वाजेपर्यंत.

 

राशिभविष्य

मेष : लोकांच्या बोलण्याला फसू नका. घरासंबंधी कामे पुढे सरकतील. नियोजित कामांत अडथळे येऊ शकतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. दिवसाच्या उत्तरार्धात काही संधी प्राप्त होऊ शकतील. कुटुंबासोबत उत्तम वेळ व्यतीत होईल. जुन्या मित्राची अचानक गाठ-भेट होऊ शकेल. कार्यक्षेत्रातील प्रयत्न यशकारक ठरतील.

वृषभ : अचानक मित्र परिवाराशी भेट होईल. मोठ्यांकडून कौतुक केले जाईल. आजचा दिवस दिलासादायक ठरेल. प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्णत्वास न्यावीत. व्यवसायिकांचा दिनक्रम व्यस्त राहू शकेल. भागीदारीतील कामे सुरू करण्यापूर्वी सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा.

मिथुन : कुटुंबामध्ये मन रमेल. घरातील मोठ्या व्यतींचा सल्ला घ्या. एकावेळी अनेक कामे पार पाडावी लागतील. मात्र, घाईघाईत कामे करणे टाळा. नियोजन, व्यवस्थापन केल्यास सर्व कामे सुरळीत आणि सुलभतेने पार पडतील. व्यवसायिकांचा एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा, विचार-विनिमय होऊ शकेल. कामे प्रलंबित ठेवू नयेत.

 

कर्क : घरातील कामात वेळ घालवाल. नोकरीत पूर्ण लक्ष देऊन काम करा. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यक्षेत्रात अधिक धावपळ संभवते. कार्यालय व कौटुंबिक पातळीवर कोणत्याही वादात पडू नये. व्यवसायिकांनी प्रथम प्रलंबित कामे प्राधान्याने मार्गी लावावीत. सहकारी वर्गाचे संपूर्ण सहकार्य लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल.

सिंह : लोकांच्या बोलण्याकडे अति लक्ष देऊ नका. प्रतिस्पर्ध्याला नमवाल. वाहन नादुरुस्तीची समस्या उद्भवू शकते. दिवसभरातील समस्येला धैर्य व संयमाने तोंड द्यावे. नोकरदार वर्गाला उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. कुटुंब, आप्तेष्ट, नातेवाईकांमध्ये आपला मान, सन्मान वाढीस लागेल.

कन्या : घरातील गोष्टींमध्ये खरेदी करून अधिक भर घालाल. आपली अडकलेली येणी सुरू होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याकडे लक्ष केंद्रीत करावे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. गुंतवणूक करण्याचा विचार असल्यास ज्येष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा.

 

तुळ : नोकरी व्यवसायात अधिकार मिळेल. हातून उत्तम लिखाण वाचन घडेल. समस्यांचे निराकरण होऊ शकेल. दिवसभर काही ना काही कामात व्यस्त राहाल. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवून कार्यरत राहावे. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद संभवतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या टाळू नयेत. संयम आणि धैर्याने परिस्थिती हाताळावी.

वृश्चिक : दिवसभरात छोटे प्रवास घडतील. आपल्या पैशाचा योग्य उपयोग घडेल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. खर्चात वाढ होऊ शकते. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास त्याचा भविष्यात लाभ मिळेल. उधारीचे व्यवहार करू नयेत. सासरच्या मंडळींशी मतभेद होऊ शकतात.

धनु : उत्साह आणि आनंदी वातावरण राहील. हातून समाजकार्य घडेल. दिवसभरात अनेक कामे पार पाडावी लागतील. नियोजन, व्यवस्थापन करून सर्व कामे उत्तमरित्या पार पडतील. सौंदर्य प्रसाधनांवरील खर्चात भर पडेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. भावंडांशी असलेले नाते दृढ होईल. मुलांकडून शुभवार्ता मिळू शकतील.

मकर : आपल्या हातून दानधर्म घडेल. अति आक्रमक वृत्तीला आळा घाला. दिनक्रम व्यस्त राहू शकेल. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल.

कुंभ : खर्चाच्या वाढत्या बोजावर नियंत्रण ठेवा. नशिबाची साथ मिळेल. एखाद्या प्रसंगी द्विधा मनःस्थिती होऊ शकेल. परदेशात राहणाऱ्या आप्तेष्टांकडून शुभवार्ता मिळतील. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस ठरू शकेल. करार फायदेशीर ठरतील. मिळतीत वाढ होऊ शकेल. मित्रांसोबत उत्तम वेळ व्यतीत कराल. प्रवास संभवतात.

मीन : नोकरीत कामामध्ये कौतुक केले जाईल. सरकारी कामे मार्गी लागतील. भाग्यवृद्धीकारक दिवस. अचानक धनलाभ होऊ शकेल. परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांना सकारात्मक वार्ता मिळतील. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकेल. नोकरदार वर्गासाठी शुभ दिवस. पदोन्नतीचे योग जुळून येऊ शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here