मोटारसायकल चोरास केले पनवेल पोलिसांनी गजाआड

panvel-bike-thief

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – पनवेल परिसरात मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड करून त्याच्याकडून चोरीच्या 5 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

 

गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि राजपूत, पोलिस उपनिरीक्षक सुनिल तारमळे, पोहवा आयरे, पोना परेश म्हात्रे, विनोद पाटील, राऊत, पोशि गर्दनमारे, घुले, परासुरे, खेडकर, चौधरी, पवार आदींचे पथक ठिकठिकाणी गस्त घालीत असताना सराईत मोटारसायकल चोर हा पनवेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.

 

त्यानुसार या पथकाने सापळा रचून निलेश लक्ष्मण कातकरी (वय-21) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडूनचोरीच्या 5 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here