प्रलंबित प्रश्नांसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर कटके यांच्या नेतृत्वाखाली ठिया आंदोलन यशस्वी

navi-mumbai-andolan

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे)- प्रलंबित प्रश्नांसाठी संघटनेच्या एका हाकेवर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर कटके यांच्या दालनामध्ये आंदोलनाकरता मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व मलेरिया कामगारांचे स्वागत करत डॉ.कटके यांनी आंदोलनाला सुरुवात केली.

 

यावेळी मलेरिया कामगारांशी बोलताना ते म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून विशेष राहणीमान भत्यातील फरक, टी डी एस च्या नावाखाली  केलेली अतिरिक्त कपात, कोव्हिड 19 तीनशे रुपये भत्ता असे अनेक विषय प्रलंबित होते, हे विषय सोडवण्यासाठी आपण वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या दालनात ठिया आंदोलन करण्यासाठी संघटनेने दिलेल्या हाकेवर आपण सर्वजण एकजुटीने उपस्थित झाले आहेत आणि हे आंदोलन यशस्वीरित्या पार पाडले, तसेच बुवांच्या अचानक निघून जाण्याने आपली ताकत कमी झाले की काय, असे नेहमीच वाटत होते परंतु आज आपण येथे उपस्थित राहून प्रशासनाला दाखवून दिले हा तोच २००३ रोजीचा मलेरिया कामगार आहे कि जो संयमाने राहतो हे जरी खरे असल्ये तरीसुद्धा अन्याय झाल्यानंतर त्याचा प्रतिकार करायला आज सुद्धा तेवढ्याच ताकदीने उभा राहतो. खरोखरच आज आपली ताकत आणि आपला संघटनेवरचा  विश्वास पाहून मन भरून आले, बुवा गेल्यानंतर आज पहिल्यांदाच आपला मलेरिया कामगार एवढा संख्येने एकजुटीने एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला. मित्रांनो खरंच मी मलेरिया कामगार असल्याचा मला अभिमान आहे. मित्रांनो आपल्या प्रश्न समस्या अनेक आहेत, आणि ते सोडवण्यासाठी आपल्याला एकजुटीने राहणे गरजेचे आहे. आपली एकजूट असिच अखंडत राहील, अबाधित राहील अशी अपेक्षा ठेवतो.

 

 

त्यानंतर,आजच्या आंदोलनासाठी उपस्थित राहिलेले संघटनेचे अध्यक्ष गजानन भोईर यांचे उपाध्यक्ष संतोष पाटील, तसेच ही संकल्पना राबवणारे संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांचे संपूर्ण मलेरिया कर्मचाऱ्यांतर्फे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here