जीव वाचविण्यासाठी ट्रॅफीक पोलिसाने मारली धावत्या कारच्या बोनेटवर उडी

trafic-police-pune

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – ट्रॅफिकचे नियम तोडणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करणं ट्रॅफिक पोलिसांना कधीकधी चांगलचं महागात पडू शकतं. काही वेळेला ते त्यांच्या जीवावरही बेततं. पण पोलिस आपल्या ड्यूटीपासून कधीच मागे हटत नाहीत, ते त्यांचं कर्तव्य चोख बजावतात. पण पोलिसांच्या जीवावर बेतणाऱ्या प्रसंगांवर आळा कसा घालणार हा प्रश्न ऐरणीवर आलाय. नुकताच एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यात पिंपरी-चिंचवड येथे एका वाहनचालकाने ट्रॅफिक पोलिसाला आपल्या गाडीच्या बोनेटवरून जवळपास एक किलोमीटरपर्यंत नेले.

 


पोलिसांनी सांगितलेल्या वृत्तानुसार एका ट्रॅफिक पोलिसाने एका वाहनचालकाला थांबण्यास सांगितले. पण वाहनचालक थांबण्याऐवजी पळून जाण्याच्या बेतात दिसला, म्हणून ट्रॅफिक पोलिस त्याच्या गाडीसमोर येऊन थांबला. गाडी थांबवण्याऐवजी त्या वाहनचालकाने गाडीचा वेग वाढवला. ट्रॅफिक पोलिसाने प्रसंगावधान दाखवत गाडीच्या बोनेटवर उडी मारली. वाहनचालकाने गाडी थांबवण्याऐवजी गाडी वेगाने पुढे नेली. साधारण एक किलोमीटरपर्यंत वाहनचालक ट्रॅफिक पोलिसाला तसंच बोनेटवरून घेऊन गेला.

 


हा थरार चालू असताना एका रिक्षाचालकाची नजर बोनेटवर लटकलेल्या ट्रॅफिक पोलिसावर पडली. रिक्षाचालकाने प्रसंगावधान दाखवत ट्रॅफिक पोलिसाचा जीव वाचवला. सदर घटनेनंतर पोलिसांनी वाहनचालक आबासाहेब सावंत याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या थरारनाट्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here