रंगकाम करताना इमारतीवरून पडून पेंटरचा मृत्यू

painting-on-building
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – रंगकाम करताना तोल जाऊन पहिल्या मजल्यावरून पडल्याने सूरज भूपाल गायकवाड (वय 33, रा. केर्ले, ता. करवीर) याचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी चारच्या सुमारास शाहूपुरी दुसर्‍या गल्लीत ही घटना घडली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली.

 



सूरज गायकवाड हा रंगकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेत होता. तसेच तोही रंगकाम करीत होता. शाहूपुरी दुसर्‍या गल्लीत विशाल भोगटे यांची इमारत रंगविण्याचे काम त्याने घेतले होते.

 



पहिल्या मजल्यावर रंगकाम करण्यासाठी तो एका स्टुलावर उभारला होता. स्टूलवरून पाय घसरून तोल गेल्याने त्याने विजेची तार हातात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विजेचा झटका बसून तो खाली कोसळला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सूरजच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here