अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीचा छापा

arjun-rampal

मुंबई (चित्रपटविभाग उपसंपादक सचिन देसाई) – बॉलिवूड ड्रग्जप्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)कडून अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकण्यात आला. पण या कारवाईत एनसीबीला अर्जुनच्या घरी काही सापडलं की नाही याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

 



दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे यामध्ये अनेक दिग्गज अभिनेत्रींची नावं समोर आली.

 



यानंतर एनसीबीने दिपिका पादुकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, रिया चक्रवर्ती यांची चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये A, D, R आणि S ही अक्षरं समोर आली होती. त्यानुसार, A म्हणजे अर्जुन रामपालच्या नावाची चर्चा होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here