प्रल्हाद भारंबे यांच्या जन्मदिनानिमित्त दोनशे लोकांना अन्नदान

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – सद्यस्थितीतील कोरोनाच्या महामारीत प्रत्येक नागरिकाचे आरोग्य हीच त्याची प्रतिकारशक्ती आहे. आरोग्य सुदृढ राहण्याकरिता नियमित आहार मिळणे आवश्यक आहे. परंतु रोजगार बंद असल्याने, जनमत प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या काही दिवसांपासून भोजन वाटप करण्यात येत आहे.
आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्रल्हाद भारंबे यांच्या जन्मदिनानिमित्त गाडेगाव येथील सरपंच सुलभा भारंबे यांनी दिलेल्या देणगीमधून दोनशे लोकांना अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, मयूर ऑफसेट बजरंग दलाचे दीपक भाऊ दाभाडे ,किसन मेथे हर्षाली पाटील हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here