हिंगोली (प्रतिनिधी) – प्रेम प्रकरणातून एका तरुणाने पोटात चाकू मारून घेतल्याची घटना आज घडली आहे. ही घटना हिंगोली येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला हिंगोलीत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदर तरुणाचे तेथील एका महिलेशी प्रेम संबंध होते. या प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या वादात, त्याने रविवारी सायंकाळच्या सुमारास त्याने पोलिस ठाणे गाठून स्वत:च्या पोटात चाकू खुपसला. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून रूग्णालयात दाखल केले.
ही घटना हिंगोली पोलिस ठाण्यातच घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे तरुणाचे नाव आणि इतर माहिती मिळू शकली नाही. परंतु तरुण आणि महिला दोघेही हिंगोली जिल्हा बाहेरील असल्याची माहिती आहे.







