सावदा पोलीस स्टेशन निरीक्षकपदी देविदास इंगोले रुजू

savada-police

रावेर (जिल्हा प्रतिनिधी हमीद तडवी) – नाशिक ग्रामिण पोलिस स्टेशन मध्ये 7 वर्षे यशस्वी सेवा कार्य केलेले,याआधी जळगाव एम आय डि सी पोलीस स्टेशन मध्ये साहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून दोन वर्षे उत्तम कामगिरी बजावली असून आता सावदा येथे पोलीस निरीक्षक पदी देविदास इंगोले यांनी सावदा पोलिस स्टेशन चा नुकताच पदभार स्वीकारला.

 

सावदा पोलिस स्टेशन ची धुरा सांभाळत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत जनतेत समन्वय ठेवण्याची महत्व पूर्ण भूमिका निभावणार असुन सर्व सामान्य नागरीकांमध्ये पोलिसदला विषयी आदर निर्माण करुन अप्रिय घटना रोखण्यासाठी पोलिसदलाचे कसोटीने प्रयत्न करून गुन्हेगाराला कायदयाची भिती वाटेल अशा पद्धतीने कामकाज करणार असुन, सामाजिक, राजकीय व्यक्तितून समन्वय राखणार, असे श्री. देविदास इंगोले यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र राज्य मराठी ग्रामीण पत्रकार रावेर तालुका संघाच्या वतीने सावदा पोलिस ठाण्यात श्री देवीदास इंगोले पोलीस निरीक्षक साहेब यांच्या स्वागत करते वेळी तालुकाध्यक्ष श्री विलास ताठे, उपाध्यक्ष श्री संतोष नवले कार्याध्यक्ष योगेश सैतवाल जगदिश चौधरी सहसचिव, जेष्ठ पत्रकार लोकमत राजेंद्र भारंबे,(महाराज) चिनावल, गिरीश नारखेडे, भिमराव कोचूरे, हमीद तडवी, नजीर शेख, आदि मान्यवर उपस्थित होते.

 

savada-police-station

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here