वर्धा (ग्रामिण प्रतिनिधी मनोज बाचले) – दि. 9 नोव्हेंबर 20290 रोजी वार सोमवार माजी शिक्षक आमदार व्ही. यु. डायगव्हाणे यांचे नेतृत्वात शिक्षणाधिकारी ( माध्य.) जि. प वर्धा यांना निवेदन देण्यात आले. चर्चेच्यावेळी विमाशीच्या शिष्टमंडळाने वर्षातील कमी झालेल्या 04 सुट्या वाढवून देण्याची मागणी एका लेखी निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी यांना केली.
यावेळी शिक्षणाधिकारी यांनी 20 नोव्हेंबर पासून 10 वी व 12 वीच्या पुरवणी परीक्षा असल्यामुळे मनुष्यबळाची गरज पडेल त्यामुळे दिवाळीला जोडून सुट्या घेणे योग्य होणार नाही, असे शिक्षणाधिकारी यांनी सुचविले. त्यामुळे विदयार्थी हित लक्षात घेता एक पाऊल मागे घेत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघा तर्फे व्ही. यु. डायगव्हाणे यांनी सदरच्या 04 सुट्या या नाताळ निमित्य द्याव्यात असे सुचविले त्यास शिक्षणाधिकारी यांनी सहमती दिली आहे.
सदर चर्चेअंती सुट्यांचे सुधारीत परिपत्रक निर्गमित करण्याची मागणी यावेळी संघटनेनी केली. त्याकरिता त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता दिवाळी सुट्यांचा असलेला संभ्रम दूर झाला आहे. यावेळी निवेदन देतांना विमाशी संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, कार्याध्यक्ष पांडुरंगजी भालशंकर, कार्यवाह महेंद्र सालंकार, उपाध्यक्ष सुनील धवने, रवींद्र वाघमारे, शशांक हुलके, सुहास गवते, इंद्रजीत ढोले, संजय बावनकर, मनोज बाचले व प्रमोद खोडे उपस्थित होते.







