वर्धा (ग्रामीण प्रतिनिधी मनोज बाचले) – औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक लोकपत्र या वर्तमानपत्रातून मास्तरड्यांनो काम कराल तर मराल काय? या शिर्षकाखाली शिक्षकांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या घाणेरड्या मनोवृत्तीच्या संपादकाचा वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीतर्फे जाहिर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
सर्व शिक्षकांचा घोर अपमान करणाऱ्या रवींद्र तहकीक या संपादकावर कठोर कारवाई करावी व सदर वृत्तपत्रावर कायमची बंदी आणावी याकरिता वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकारी वर्धा यांचे मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मंगळवार दि. 10 नोव्हेंबर 2020 ला दुपारी ठीक 12 .00 वाजता निवेदन दयायचे आहे. त्याकरिता सर्वांनी मोठया संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समिती, जिल्हा वर्धा तर्फे करण्यात आले आहे.
या आंदोलनात मुख्याध्यापक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, खाजगी प्राथमिक शिक्षक संघ, विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन, प्रजासत्ताक शिक्षक संघ, खाजगी माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, जूनी पेन्शन हक्क संघटना आदी संघटना सहभागी होणार आहेत.







