शिक्षकांविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या ‘त्या‘ संपादकावर कारवाई करण्याची वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीची मागणी

varadha-shikshak-samanvay-samiti

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – आज मंगळवार दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकारी वर्धा यांचे मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना शिक्षकांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या ‘त्या’ संपादकावर कठोर कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले.

 

औरंगाबाद येथून प्रकाशित दैनिक लोकपत्र या वर्तमानपत्रातून “मास्तरड्यांनो काम कराल तर मराल काय?” या शिर्षकाखाली शिक्षकांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या घाणेरड्या मनोवृत्तीच्या संपादकाचा वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीतर्फे जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला.vardha

 

तसेच सर्व शिक्षकांचा घोर अपमान करणाऱ्या या संपादकावर कठोर कारवाई करावी व सदर वृत्तपत्रावर कायमची बंदी आणावी अशी मागणी यावेळी वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीद्वारे करण्यात आली. व यापुढे शिक्षकांबद्दल कोणीही विनाकारण आक्षेपार्ह लिखाण केल्यास वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला.

 

यावेळी मुख्याध्यापक संघटनेचे सतिश जगताप, मनोहर बारस्कर, प्रदीप गोमासे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय कार्यवाह अजय वानखेडे, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविबाबु शेंडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजू चंदनखेडे, कार्यवाह महेंद्र सालंकार, शशांक हुलके, इंद्रजीत ढोले, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण भोयर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कार्यवाह सुरेश रोठे, महिला आघाडी प्रमुख मनीषा साळवे, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे राज्याध्यक्ष अरुणकुमार हर्षबोधी, प्रकाश कांबळे, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा सचिव प्रमोद खोडे, वर्धा तालुकाध्यक्ष मंगेश भोमले, संघटन सहसचिव सागर मसराम, देवळी तालुकाध्यक्ष रितेश निमसडे, श्री लांडे, संजय बावनकर, गिरीश बोरकर, सुनील भोयर,राजेश बोरकर, प्रसाद चंदरवार, मिलिंद सालोडकर, योगेश फिरंगे, किशोर ढाले, प्रकाश गुजर, उत्तम नन्होरे, दिलीप गिरडकर, देवेंद्र टेकाडे, गौतम पाटील, दिनेश वाणी, सतिश सुरकार आदी शिक्षकांसह वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीतील सहभागी शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी / सदस्य व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. vardha-teacher

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here