भंडारा (वृत्तसंस्था) । शाळेत बालकांवर संस्कार काम करणारा शिक्षकच वर्गात अश्लील व्हिडीओ दाखवायचा आणि अश्लील चाळे करायचा. हा प्रकार लक्षात येताच संतप्त गावकरी आणि महिलांनी त्याला भर चौकात चपलेने बदडून काढले. त्यांनतर त्याला पोलिसांना स्वाधीन करून तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या आरोपी शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
शिक्षक अनिल जगन राठोड (५४) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी उघडकीस आली. अनिल जगन राठोड पाच वर्षांपूर्वी तो या शाळेत बदलून आला होता. वर्ग सुरु झाल्यावर विध्यार्थ्यांना बाहेर काढून तो विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवायचा. एवढेच नाही तर, त्यांच्यासोबत वर्गात विकृत चाळेही करायचा. हा प्रकार वाढल्यावर काही विद्यार्थिनींनी पालकांना माहिती दिली. ही वार्ता गावभर पसरताच संतप्त पालकांनी शाळेकडे धाव घेतली. काही महिलांनी त्याला शाळेबाहेर काढून या प्रकाराबद्दल विचारणा केली. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. हे पाहून महिला संतापले आणि त्यांनी त्याला पकडून चपलांनी बडवले. संतप्त गावकर्यांनी आणि पालकांनीही त्याला या कृत्याचा जाब विचारला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ कारवाई करत संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. आरोपी शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







