शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : विस्थापितांचे आदर्श पूर्नवसन करण्याचा शब्द पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी नगरपरिषद निवडणुकीमध्ये दिला. त्यावर विश्वास ठेऊन प्रभाग क्रमांक नऊ मधील मतदारांना सर्वाधिक मताधिक्याने मला व सौ अलका गोतीस यांना विजयी केले. आता माजी खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी पूर्नवसनाची प्रक्रीया सुरू करून निवडणुकीत दिलेल्या अश्वासनाची पूर्ति सुरू केली. शब्द पाळणारा नामदार राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतील पूर्नवसन प्रकल्प राज्याला दिशा देणारा ठरणार आहे. अशी माहिती पालिकेच्या स्वच्छता, आरोग्य वैद्यकीय समितीचे सभापती दीपक गोंदकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
प्रभाग क्रमांक नऊ मधील सुमारे दीडशे पेक्षा अधिक त्विस्थापीत कुटूंबांना आदर्श असे पूर्नवसन( ना. राधाकृष्ण नगर) मधील प्रकल्पातील जागेचे पट्टे देण्यास शिर्डी नगर परिषदेने सुरवात केली आहे. पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून या जागेवर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सुसज्ज घरकुल बांधून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
– दीपक भैय्या गोंदकर
(सभापती, स्वच्छता, आरोग्य व वैद्यकीय समिती )
यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेसचे ज्येष्ठनेते बाबासाहेब कोते, रमेश गोंदकर व माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर आदि उपस्थित होते. गोंदकर म्हणाले, शिर्डी नगरपरिषद निवडणुकीपूर्वी माझ्या प्रभाग क्रमांक नऊ मधील आंबेडकर नगर व नागाव रोड येथील जलसंपदा विभागाच्या जागेवर असलेल्या घरावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवीण्यात आली. त्यात दीडशे पेक्षा जास्त कुटूंबे विस्थापित झाली होती. त्यावेळी शिर्डीतील सर्व विस्थापितांचे आदर्श पूनर्वसन करू असा शब्द पालक मंत्री विखे पाटील यांनी दिला होता. हि अश्वासन पूर्ति करण्यासाठी विखे पाटील महसूल मंत्री असताना त्यांनी थीम पार साठी 24 एकर तसेच शिर्डीतील झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यासाठी सुमारे सहा एकर भूखंड शेती महामंडळाच्या मालकीचा नगरपरिषदेकडे हस्तांतरीत केला.
युवानेते डाॅ.सुजय विखे पाटील यांनी हा भुखंड विकसित करण्यासाठी. शिस्तप्रिय मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी शासन स्तरावर विविध विभागाच्या मंजुरी घेण्यासाठी विशेष परिश्रम घेऊन हि योजना कागदावर प्रत्यक्षात साकार केली. प्रशस्त रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पथदिवे, अंतर्गत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी देशी झाडे, जीम आणि सुसज्य अंगणवाडी अशा सर्व सुविधा या भुखंडावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक विस्थापित कुटूंबाल अर्धा गुंठा जागा दिली जाईल. त्यासाठी पट्टे वाटपाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहे. त्यामुळे विस्थापित कुटूंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा राज्यातील एक आदर्श ना राधाकृष्ण विखे पाटील नगर पूर्नवसन प्रकल्प असेल.







