जळगाव – आज (दि.५) तपासणीसाठी स्वॅब पाठविलेल्या कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात आज २५४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
या २५४ रुग्णांत जळगाव शहर ६४, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ८, अमळनेर १५, चोपडा २३, पाचोरा ४, धरणगाव ६, यावल २५, एरंडोल १३, जामनेर २, रावेर २२, पारोळा ३, चाळीसगाव १९, मुक्ताईनगर २१, बोदवड २४ व दुसऱ्या जिल्ह्यातील २ रुग्ण असा समावेश आहे. त्यामुळे आज अखेर जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४४३० झाली आहे. सद्यस्थितीत २६११ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १५४८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्यातील २०७ रुग्ण अत्यवस्थ आहेत.
दरम्यान आज बरे झालेले रुग्ण १३५ असून, आज ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने, जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता २७१ झाली आहे. ७ जुलै ते १३ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाला असून, सर्व नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.







