
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – पारोळा तालुक्यातील एका अनामिका सोबत तीन नराधमांनी अन्याय, अत्याचार केला व तिला विष पाजले दोन दिवसानंतर तिचा मृत्यू झाला त्याचा त्रिव घटनेचा त्रिव निषेध करून मौलाना अबुलकलाम आझाद यांची १३२ जयंती निमित्त अजिंठा चौकास त्यांचे नाव द्या हे दोन निवेदन युवक काँग्रेस चे सरचिटणीस बाबा देशमुख यांच्या नेतृवात जिल्हा अधिकारी यानां देण्यात आले.
अनामिका व इतर पीडितांसाठी दिशा कायदा लागू करा
खान्देश मध्ये याच महिन्यात चार मुलीवर अत्याचार होऊन त्यामुळे त्यांचे प्राण गमवावे लागले म्हणून महाराष्ट्रात त्वरित दिशा कायदा लावण्यात यावा व आरोपींना त्वरित २१ दिवसात फाशी ची शिक्षा करावी
पोलिसानीच ८दिवसात दोषरोपण दाखल करावे. जळगाव पोलिसांनी तपास करून ८ दिवसातच दोषरोपण दाखल करावे व जलद न्यायालयात प्रकरण चालवून आरोपींना शिक्षा द्यावी. अशी मागणी करण्यात आली.
मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नाव जळगाव शहराच्या प्रवेश द्वाराला द्यावे
दुसरे निवेदन सौ रत्ना बागुल यांचे हस्ते देण्यात आले त्यात स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री व भारतरत्न पुरस्कार मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची बुधवार ११ नोव्हेंबर रोजी १३२ वी जयंती असल्याने त्यांच्या या जयंतीनिमित्ताने जळगावात कोणत्याही अल्पसंख्यांक स्वातंत्र्य सैनिकाचे नाव बगीचा,चौक,रस्ता यांना दिलेले नाही त्या मुळे त्यांनी केलेले कार्य व इतिहास नवीन पिढीला कळायला पाहिजे म्हणून जळगाव शहरातुन जात असलेल्या महामार्ग मधील अजिंठा चौकास स्वातंत्र्य सेनानी, भारतरत्न अबुल कलाम आझाद यांचे नाव देण्यात यावे अशी सुद्धा मागणी दुसऱ्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
दोघी निवेदनावर यांच्या स्वाक्षऱ्या
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस बाबा देशमुख, मानियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, कास्ट्राईब संघटनेच्या श्रीमती रत्ना बागुल, महिला सल्लागार समितीच्या निवेदिता ताठे , मानियार बिरदारीचे शहर अध्यक्ष सैयद चाँद, जळगाव काँग्रेस महानगर चे नदीम काझी, राष्ट्रट्वादी काँग्रेस पक्षाचे सलीम इनामदार, शिवसेना महानगर उपाध्यक्ष रईस शेख, शिकलगर बिरादरीचे अजीज खान,ईदगाह ट्रस्ट चे मजहर खान, कुल जमातीचे डॉ जावेद, एच आय व्ही संघटने च्या मनीषा बागुल, अडव्होकेट आमिर शेख, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना निवेदन
दोघी निवेदन उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना बाबा देशमुख व श्रीमती रत्ना बागुल यांच्या हस्ते देण्यात आले दोघी निवेदना बाबत माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक, माननीय आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय त्वरित घेण्यात येईल असे आश्वासन भारदे साहेबांनी दिले.






