जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आज दिपावलीच्या प्रथम दिवस वसुबारसनिमित्त श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठान च्या माध्यमातून आज हरी विठ्ठल नगर मध्ये वसुबारस निमित गौ मातेचे पूजन व दिवाळीनिमित्त महापालिकेच्या साफसफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते पूजन करून मिठाई देण्यात आली.
याप्रसंगी श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक दाभाडे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, जनमत प्रतिष्ठानच्या सचिव सौ हर्षाली पाटील, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे सचिव आबा माळी, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान चे सदस्य श्री नंदू शेठ सनान्से, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे खजिनदार सुरज तडवी, श्रीमंत प्रतिष्ठानचे सदस्य दिनेश खारकर आदी उपस्थित होते.








