ह.भ.प. व वारकरी किर्तनकार ज्ञानेश्वर झगरे यांचे व्याख्यान
चोपडा (रविंद्र पाटील) - येथील विवेकानंद विद्यालयात प्रतिवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावर्षी सर्वीकडे कोरोनाचे सावट असल्याने व लॉकडाऊन असल्यामुळे गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी ? असा प्रश्न समोर असताना, विद्यालयाच्या मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने व कलाशिक्षक राकेश विसपुते,उपशिक्षक पवन लाठी यांच्या कल्पनेतून गुगल मीट या ॲपद्वारे ऑनलाइन पध्दतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी नियोजन करण्यात आले व ते यशस्वी ठरले.जिल्हा परिषद शाळा उमरखेडा, केंद्र राजूर ,तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथील प्राथमिक शिक्षक ह.भ.प. व वारकरी कीर्तनकार ज्ञानेश्वर गणपत झगरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या नावीन्यपूर्ण व तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत उपक्रमाची सुरुवात चोपडा येथील श्री संत गजानन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मनोज भाऊ चित्रकथी, नरेंद्र भावे यांच्या अभंग गायन व तबला वादनाने झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना नरेंद्र भावे, व्याख्यातांचा परिचय,स्वागत व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपशिक्षक पवन लाठी व आभार प्रदर्शन कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले. या ऑनलाइन व्याख्यानास संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर,उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल,सचिव अॅड. रवींद्र जैन विश्वस्त सुधाकर केंगे,मंगला जोशी, डॉ.विनीत हरताळकर,डॉ.नीता हरताळकर,डॉ.अमित हरताळकर, ज्योत्स्ना हरताळकर,मुख्याध्यापक नरेंद्र भावे,मुख्याध्यापिका आशा चित्ते, इंग्लिश मिडीयम मुख्याध्यापिका सुरेखा मिस्त्री,विवेक बाविस्कर, कृतिशील शिक्षक महाराष्ट्राचे राज्य संयोजक नारायण मंगलाराम, यांच्यासह विद्यालयाचे सर्व शिक्षक पालक,विद्यार्थी आपापल्या घरूनच ऑनलाइन उपस्थित होते. व्याख्यानात ह.भ.प. झगरे गुरुजी यांनी गुरु-शिष्य परंपरा,परंपरे संदर्भात मार्मिक असे दाखले देत त्या संदर्भात छान छान बोधपर गोष्टी सांगितल्या. तसेच ते म्हटले गुरूने सांगितलेल्या गोष्टींवर ज्या शिष्याची अटळ निष्ठा असते,त्याला त्याची प्राप्ती होते. आपल्या विद्यार्थ्यांची क्षमता,कल कशात आहे हे ज्या गुरूला ओळखता येते तो खरा गुरू आणि गुरू ने सांगितलेली गोष्ट कटाक्षाने पाळणारा, आचरणात आणणारा तोच खरा विद्यार्थी.ज्या ज्या वेळेस ज्याच्या -ज्याच्या कडून शिकण्यास मिळाले तो-तो आपल्या गुरु समजावा, मग तो वयाने लहान असो वा मोठा. मनुष्य जीवनात कर्म करत असतो, त्या कर्माचे अपेक्षित फळ मिळावे असे त्याला वाटत असते,प्रत्येकाला काहीतरी निर्माण करण्याची अपेक्षा असते, परंतु या गोष्टीसाठी पूर्तता असणे गरजेचे आहे आणि ती पूर्तता म्हणजे त्याच्या जीवनामध्ये कोणाचातरी उदय होणे. व हा उदय आपल्या जीवनात सद्गुरु आणतात. असे या वेळेस ते म्हटले







