भाजपातर्फे रंकाळा पसिरात वृक्षारोपण व औषधी वाटप

कोल्हापूर (नियाज जमादार) – शाहरुख गडवाले युवा प्रमुख भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापूर महानगर यांच्या वाढदिवसानमित्त भारतीय जनता पार्टी च्या वतीने प्रभाग क्रमांक 49 रंकाळा स्टँड परिसर येथे गायत्री राऊत भाजपा महिला जिल्हाध्यक्षा कोल्हापूर महानगर, विराज चिखलीकर, मंगेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भागातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम 30 होमिपॅथिक औषधाचे वाटप केले. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दुसऱ्या टर्म मधील यशस्वी कार्याचा आढावा असलेले पत्रकही देण्यात आले.
भाजपा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष मा. श्री. महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोड यांचे सहकार्य लाभले. यावेळी शाहरुख गडवाले युवा प्रमुख भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापूर महानगर, गायत्री राऊत भाजपा महिला जिल्हाध्यक्षा कोल्हापूर महानगर, विराज चिखलीकर, साहिल जमादार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापूर महानगर, रणवीरसिंह निंबाळकर सरकार, सेऊल गोलंदाज, तोफिक बागवान भाजपा जिल्हा चिटणीस कोल्हापूर महानगर, प्रदीप घाटगे (पिटू), अंशुल चौगुले, मंगेश पाटील, सुनिल पाटील,स्वाती पाटील, सीमा काशीद, शोभा पाटील, अमृत पाटील, सुमित काशीद, सूरज गोसावी, अजिम दाफेदार, सुमित काशीद , मंगेश देसाई, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here