जळगाव जिल्ह्यात नवीन 156 बाधीत रुग्णांची भर

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात तब्बल 156 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 4 हजार 586 झाली आहे. आज सर्वाधिक कोरोनाबाधीत 56 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे. दिवसभरात 11 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.
आज नव्याने 156 रूग्णांची त्यात भर पडली आहे. यात जळगाव शहर 56, जळगाव ग्रामीण 18, भुसावळ 12, अमळनेर 7, चोपडा 8, पाचोरा 4, भडगाव 3, धरणगाव 7, यावल 3, एरंडोल 1, जामनेर 13, रावेर 12, मुक्ताईनगर 10 , बोदवड 1 व अन्य जिल्ह्यातील 1 याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात 11 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 1, चाळीसगाव, एरंडोल व यावल तालुक्यातील प्रत्येकी 2, पारोळा, भुसावळ, भडगाव, रावेर या तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here