जळगांव (संपादक सुनिल पाटील) – वर्षामागून वर्ष जात असताना आपल्या पूर्वापार रुढी व परंपरांमध्ये बदल होत आहे. कोरोनासारख्या महामारीमध्ये काही पारंपारिक गोष्टींचा विसर पडत चालला आहे अशा गोष्टींना वाव देण्यासाठी श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठान कडून आज रायसोनी नगरमध्ये दिवाळीनिमित्त मातीचा किल्ला बनविण्यात आला.
यावेळी मोहन संजय कुळकर्णी, वरद सारंग कुलकर्णी, वैभव विलास जोशी, सोहम आहिरे राहुल सोनवणे समीर कुलकर्णी या चिमुकल्यांनी छान पैकी सुट्ट्यांमध्ये किल्ला बनवून रूढी व परंपरा कायम ठेवली त्याप्रसंगी त्यांना अध्यक्ष दीपक भाऊ दाभाडे पंकज नाले व सुरज दायमा यांच्यातर्फे सन्मानपत्र देण्यात आले.








