जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव जि जळगाव येथील मा.नगराध्यक्ष निवासी मूकबधिर विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष व बुलंद पोलीस टाईमचे उपसंपादक पी.एम.पाटील यांची राष्ट्रीय विकलांग पार्टी दिल्ली या पार्टीच्या जळगांव जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पी.एम.पाटील हे २५वर्षा पासून दिव्यांग,निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवाभावी काम करतात. त्यांच काम पाहून त्यांना राष्ट्रीय विकलांग पार्टी महाराष्ट्र यांनी जळगांव जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली असून, यासंदर्भातील नियुक्ती पत्रही त्यांना दिले आहे..
त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष के.के दीक्षित,श्रीमती गोलू हाजीजी,श्रीमती राजकुमारी शुक्लाजी,पंकज त्रिपाठी,प्रदेश अध्यक्ष धनराज गायकवाड, उपअध्यक्ष धनंजय कुमार यांनी अभिनंदन केले.








