धाराशिव (प्रतिनिधी सुरेश बागडे) – दिवाळीच्या सुट्टीत गावी गेल्याने घरात कोणी नसल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी परंडा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधिश यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याची कडी तोडून घरातील २७ हजारांचा ऐवज लंपास केला हि घटणा दि १३ नोव्हेंबर रोजी मध्य रात्री च्या सुमारास घडली .
या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की न्यायाधिश हे येथील समर्थ नगर येथे दत्तात्रय मुळीक यांच्या मालकीच्या घरात भाड्याने राहत होते . दिवाळी सुट्टी असल्याने त्यांनी घराला कुलूप लाऊन गावी गेले होते . दि १३ रोजी मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कडी तोडून घरातील लॅपटॉप किंमत १२ हजार व रोख रक्कम १० हजार व एक कॅमेरा किंमत ५ हजार चोरून नेले आहे .
घटनेची माहिती मिळताच पो . नि सुनिल गिडे , पो उप निरिक्षक मोमीन यांनी घटणा स्थळी भेट देऊन पंचनामा केला . चोरी तपास कामी धाराशिव येथील ठसे तज्ञाना पाचारन करण्यात आले होते . घर मालक मुळीक यांच्या फिर्यादी वरून परंडा पोलिसात अज्ञात चोरा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पो उप निरिक्षक मोमीन हे करीत आहेत.







