नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – ग्रामिण बहुउद्देशिय विद्या प्रसारक मंडळ वडाळी तथा नवनाथ सेवाभावी ट्रस्ट या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शहिद भगतसिंग सार्वजनिक खुले वाचनालय तथा छत्रपती शिवाजी महाराज भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन युवकमित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रविण महाजन यांच्या हस्ते करण्यात आले
प्रविण महाजन संस्थापक अध्यक्ष युवकमित्र परिवार पुणे
वडाळी गावात एकाच दिवशी दोन मोफत सार्वजनिक वाचनालय तसेच एका भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन म्हणजे युवावर्गासाठी हि खरी दिवाळी आहे युवक हा सक्षम झाला तर देश सक्षम होईल या उपक्रमासाठी भविष्यात युवकमित्र परिवारातर्फे आणखी पुस्तके पाठवली जातील.
याप्रसंगी कार्यक्रमाला वडाळीचे प्रभारी सरपंच श्री.हिंमत सोनवणे,माजी सरपंच दिपक पाटील,माजी उपसरपंच अभय गोसावी,पोलिस पाटील गजेंद्रगीर गोसावी,नवनाथ ट्रस्टचे सचिव महेंद्र जगताप सदस्य भिकाअप्पा निकम ,अरूण जगताप,नथा महाराज ,ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय मिस्त्री,स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे,ग्रामिण बहुउद्देशिय विद्या प्रसारक मंडळ वडाळी उपाध्यक्ष दिनेश पवार ,विदयमान सचिव चंद्रकांत रायसिंग,भरतीपुर्व केंद्र प्रशिक्षक भूषण बेलदार,मनोज माळी,आदी उपस्थित होते गावातील युवकांना व्यासपिठ उपलब्ध केल्यामुळे मार्ग सुकर झाला आहे युवकांनी याचा लाभ घ्यावा असे मत ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय मिस्त्री यांनी व्यक्त केले 
भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्रासाठी संस्था स्वयंखर्चाने सोईसुविधा उपलब्ध करणार असून परिसरातील प्रशासकिय अधिकारी वर्ग यांना अभ्यसिका वर्गात निमंत्रित करून युवकांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल असे मत केंद्र संचालक भूषण बेलदार यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामिण बहुउद्देशिय विद्या प्रसारक मंडळाचे विदयमान सचिव श्री.चंद्रकांत रायसिंग यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.महेंद्र जगताप यांनी केले.







