मुंबई (प्रतिनिधी कमल कचर कर्डक) – मुंबई वास्तव्यास असणारे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भुमिपुत्र तसेच शासकिय स्पर्धा परिक्षांच्या दृष्टीकोनातून तिमिरातुनी तेजाकडे या सामाजीक उपक्रमाद्वारे संपुर्ण महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण करून प्रत्येक युवक वर्गास प्रेरणास्थान ठरणारे आदर्श, हुशार, अभ्यासू असे मार्गदर्शक सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क (MUMBAI CUSTOMS) यांनी एलएलबी ही व्यावसायिक पदवी उत्तीर्ण करून सातवी पदवी संपादित केली. त्याबद्दल श्री. दिनेश बंडू सोरखादे, समाजसेवक, उद्योगपती, डोंबिवली श्री विजेंद्र राकेश चौधरी, ठाणे जिल्हा चिटणीस, माथाडी कामगार सेना, श्री सचिन यशवंत रेडकर, उपाध्यक्ष, डोंबिवली ग्रामीण युवा मोर्चा, भाजपा, श्री अजित पवार, समाजसेवक श्री अमित सिंग, समाजसेवक तसेच अन्य पदाधिकारी व मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.









