प्रतिकदादा, माणदेशासह दुष्काळी , मागास तालुक्यांचा आत्मा – आवाज बना !

sadik-khatic-and-pratikdada

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांचे भावनिक आवाहन

आटपाडी (प्रतिनिधी ) – ना. जयंतराव पाटील वाळवे तालुक्याला सह राज्याला आणखी २५ वर्षे बलवान, मजबूत आणि दैदिप्यमान नेतृत्व देवू शकतील इतकी प्रचंड ऊर्जा , प्रतिभा आणि धमक त्यांच्यात आहे . प्रतिकदादा, तुम्ही राज्याचे नेते व्हाच तथापि प्रामुख्याने माणदेशाचा, दुष्काळी, मागास तालुक्यांचा आत्मा – आवाज बना.असे भावनीक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी केले आहे .

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी आटपाडी तालुक्यात प्रथमतः येत असलेले राज्याचे युवा नेते प्रतिकदादा जयंतराव पाटील यांना उद्देशून सादिक खाटीक यांनी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून त्यांना पाठविलेल्या खास भावनीक पत्राद्वारे हे आवाहन केले .
या पत्रात सादिक खाटीक यांनी ,आपले परमपुज्य आजोबा महाराष्ट्राचे नेते आदरणीय राजारामबापू पाटील यांचा आणि दुष्काळी, उपेक्षित, मागास आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहंकाळ, माण, खटाव, फलटण, खंडाळा तालुक्यांशी सुमारे ४० वर्षापासूनचा घनिष्ट संबध होता .वयाच्या पंचवीशी नंतरच्या पाच सात वर्षात सांगली जिल्ह्या समवेतचा, त्यावेळचा एकसंघ सातारा जिल्हा फिरून राजारामबापूंनी शेकडो गांवाना ,हजारो कार्यकर्त्याना आपलेसे केल्यानेच राजारामबापू , सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष झाले आणि त्यांनी, दुष्काळी तालुक्यांशी असलेली आत्मीयतेची भावना वृद्धींगत करण्यासाठीच दुष्काळी आटपाडी तालुक्यातील वडिलधारी, लढवय्ये ,जिगरबाज नेतृत्व कै .रस्तुमरावबापू नानासाहेब सेनासुभे चव्हाण – देशमुख ( आटपाडी ) यांना सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले उपाध्यक्ष केले .

 

 

औध संस्थान काळातल्या आमदारकी, नामदारकी नंतरचा स्वातंत्रोत्तर काळातला आटपाडीचा पहिला मोठा बहुमान आदरणीय राजारामबापूंमुळेच झाला . बापूंनी लोकल बोर्डाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर आणि विशेषतः दुष्काळी तालुक्यांमध्ये गावोगांव प्राथमिक शाळा सुरु केल्या . पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनीक विहीरी, बारव , आड ,पाणवठे,शेतीच्या पाण्यासाठी पाझर तलाव, गाव तलाव , मोठे तलाव साकारण्यात तसेच आरोग्य व्यवस्थेचे जाळे निर्माण करण्यात राजारामबापू यशस्वी झाले . उपाध्यक्ष पदाबरोबर शिक्षण खात्याची जबाबदारी मिळालेल्या रस्तुमरावबापूंची त्यांना मोलाची साथ लाभली . त्यानंतरच्या काळातही बापूंनी दुष्काळी तालुक्यांसाठी मोठे काम केले , औद्योगीक वसाहती, विविध उद्योग, साखर कारखानदारी , गावोगावी विजेची व्यवस्था साकारताना त्यांनी दुष्काळी भागाला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला . सांगोला तालुक्यातल्या चिंध्यापीर ला चाललेला आटपाडी तालुका वाशीयांचा आत्मीयतेचा माणगंगा सहकारी साखर कारखाना आटपाडी जवळच्या सोनारसिध्द येथे साकारण्यात राजारामबापूंची मुख्यमंत्री महोदयां जवळची शिष्टाईच यशस्वी झाली . आटपाडी जवळचा २५० एम.सी.एफ.टी.चा मोठा तलाव, आटपाडीतल्या बापूंच्या नावच्या राजारामबापू हायस्कूलची निर्मिती केवळ अन् केवळ राजारामबापूं मुळेच झाली . शेकडो ज्येष्टां बरोबर हजारो तरुणांना सर्वच क्षेत्रात राजारामबापूच दीपस्तंभ ठरले .

आदरणीय बापूंच्या नंतर राजकारणात आलेले आपले प्राणप्रिय पिताश्री जयंतराव पाटील साहेबांनी गत ३५ वर्षात देशाला दिपवणारे मोठे काम राज्यभर केले आहे . टेंभू, म्हैशाळ, ताकारी सारख्या असंख्य पाणी योजनांसाठी जयंतराव साहेबच मसिहा बनले . राज्यातल्या दुष्काळी तालुक्यांचे भगिरथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयंतराव साहेबांनी आटपाडी तालुक्याचे शिल्पकार कै. बाबासाहेब देशमुख यांच्या पहिल्या स्मृती दिनी म्हणजे ३० मे १९८७ रोजी आटपाडीतल्या साहित्य संमेलनाचे निमित्ताने आटपाडी तालुक्यात पहिले पाऊल ठेवले . गत ३३ वर्षाच्या अथक भ्रमंतीतून सर्वच उपेक्षित, मागास, दुष्काळी तालुक्यांना , तेथील फाटक्या लोकांना मोठा आधार देण्याची भूमिका इमानदारीने त्यांनी निभावली आहे .

आजच्या आपल्या आटपाडी तालुक्यातल्या येण्याने आपल्या घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिक बनत ” बापू – साहेब – दादा ” च्या रुपाने आपली यशस्वी, आश्वाशक , सारे जहाँला कवेत घेणारी पावले टाकीत आहात .यामुळे आपल्या घराण्याचे आटपाडी तालुक्याशी असलेले ७० – ७२ वर्षाचे घनिष्ट संबंध आणखी बळकट व वृद्धींगत होत आहेत, असे शेवटी त्यांनी स्पष्ट केले .

गुरुवार दिवस भरातल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून प्रतिकदादा पाटील यांनी सायंकाळी अनेक मान्यवरांसह सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी भेट दिली . फटाक्यांची आतषबाजी करीत आणि जोरदार घोषणांनी त्यांचे स्वागत करणेत आले . अत्यंत सदगदीत अंतःकरणाने ” प्रतिकदादा तुमचे अभिनंदन , तुमच्या रुपाने आज माझ्या घरी आदरणीय राजारामबापू पाटील, आदरणीय जयंतराव पाटील साहेबच आले आहेत, माझ्या शालेय जीवनापासूनची आज अखेरची तपश्चर्या फळाला आली आहे, आज माझा परिवार धन्य झाला .असे उद्‌गार सादिक खाटीक यांनी काढले . यावेळी प्रतिकदादांचा फेटा, शाल पुष्पहार देवून सन्मान करणेत आला .

 

 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक बापू, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील बापू, खानापूर तालुक्याचे युवा नेते, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा सदाशिवराव पाटील ,खानापूर आटपाडी मतदारसंघ राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुशांत देवकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादी पदवीधरचे जिल्हा अध्यक्ष प्रविण दबाणे , राष्ट्रवादी सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष बिरुभाऊ केसकर, तालुका युवक अध्यक्ष सुरज पाटील, विट्याचे नगरसेवक अविनाशनाना चोथे , राहुलआण्णा हजारे , युवा उद्योजक विनोद पाटील विटा . आटपाडी शहर अध्यक्ष संभाजीराव पाटील, युवा नेते अतुल पाटील आटपाडी , नारायणराव खरात, अशोकराव सुतार इस्लामपूर , युवा नेते किशोर गायकवाड शेटफळे, अमित गिड्डे तडवळे , इन्नुस खाटीक, दिलावर शेख,सुहास पाटील, संग्राम जाधव, नितीन डांगे, प्रकाश तळे , रामचंद्र जाधव, कुर्बानहुसेन खाटीक, अमीर खाटीक, सलमान शेख, सचिनबापू पाटील, समीर खाटीक, दिग्विजय देशमुख छोट्या , मनोज कवडे,रोमी शेख , पुनित काळसेन, मुदस्सर कोतवाल, रज्जाक कोतवाल,, रियाज शेख, मोहसीन शेख, सुरेश हंचे, जलिलअहमद शेख, नयूम शेख, वसीम शेख, सोमनाथ जाधव, कलंदरबाबा खाटीक, नदिम खाटीक, लखन तांबोळी, फिरोज मेंडके,सूर्यकांत बाबर, अनमोल कलढोणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here