पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारास सांगली पोलिसांनी केले जेरबंद

पिस्तूल

सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) । कोल्हापूर रस्ता परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारास सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गजाआड केले. आकाश सचिन शिंदे (वय २३, रा. पन्नास फुटी रस्ता, हमजा मस्जिदजवळ, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगांवकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पोलिसांना कोल्हापूर रस्ता परिसरात एक तरुण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन आकाश शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केल्यानंतर देशी बनावटीचे पिस्तूल व काडतूस मिळाले. पिस्तूल व काडतूसबाबत चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडून ५० हजाराचे पिस्तूल व काडतूस जप्त करण्यात आले.
त्याच्याविरूद्ध पोलिस अंमलदार दिग्विजय साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक होळकर तपास करत आहेत. या कारवाईत पोलिस अंमलदार विनायक शिंदे, सतीश लिंबळे, रफीक मुलाणी, दिग्विजय साळुंखे, शंकर रणधीर, योगेश हाक्के, योगेश सटाले, गणेश कोळेकर, संदीप कोळी, अभिजित पाटील आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here